22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रनवनीत राणांचा कोठडीत छळ झाला नाही; गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण

नवनीत राणांचा कोठडीत छळ झाला नाही; गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण

एकमत ऑनलाईन

मुंबई : नवनीत राणा यांचा कोठडीत कोणत्याही प्रकारे छळ झाला नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. खासदार नवनीत राणा यांनी जेलमध्ये आपल्यासोबत हीन वागणूक केल्याचा आरोप पोलिसांवर केला आहे. त्यावर वळसे-पाटील यांनी स्पष्टीकरण दिले.

पाटील म्हणाले की, आतापर्यंत झालेली कारवाई ही कायद्यानेच करण्यात आली आहे. राणांना कोठडीत हीन वागणुकीचा प्रकार घडलाच नाही. लोकसभेच्या सचिवांना राज्य सरकार अहवाल पाठवणार आहे, असे वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरेंच्या सभेवर दोन दिवसांत निर्णय
पुढे वळसे-पाटील यांनी राज ठाकरेंच्या औरंगाबादेतील सभेवर भाष्य केले. ते म्हणाले की, राज ठाकरेंच्या सभेच्या परवानगीचा निर्णय हा दोन दिवसांत होणार आहे. औरंगाबादचे आयुक्त याबाबत निर्णय घेतील. नियमांचे उल्लंघन केल्यास पोलिस कारवाई करणार असल्याचेही पाटील म्हणाले.

प्रकरणाची चौकशी केली जाईल
पुढे पत्रकारांनी वळसे-पाटील यांना किरीट सोमय्यांवर दाखल झालेल्या एफआयआरवर प्रश्न विचारले असता पाटील म्हणाले की, राज्यात विरोधकांकडून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोमय्या यांनी तक्रार दाखल केली तर पोलिस त्याची चौकशी करतील. त्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे वळसे-पाटील म्हणाले.

नवनीत राणांनी काय केले होते आरोप?
नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून मुंबई पोलिस आणि तुरुंग प्रशासनावर गंभीर आरोप केले होते. दलित असल्याने आपल्याला पाणी दिले जात नाही आणि कारागृहातील शौचालय वापरण्याची परवानगी दिली जात नसल्याचा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी पत्रात केला होता. या पत्राची लोकसभा सचिवालयाने दखल घेतली असून यासंदर्भातील अहवाल २४ तासांत सादर करण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या