24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeमहाराष्ट्रगडचिरोलीत नक्षली कमांडर ताब्यात

गडचिरोलीत नक्षली कमांडर ताब्यात

एकमत ऑनलाईन

गडचिरोली : खोब्रामेंढा झ्र हेटाळकसाच्या जंगलात नक्षलवादी व पोलिस पथकात झालेल्या चकमकीत पायाला गोळी लागून गंभीर जखमी झालेला टिपागड दलम कमांडर किशोर उर्फ गोंगलू उर्फ सोबू घिसू कवडो याला नक्षलवादी जंगलात सोडून पळून गेले होते. हा जखमी नक्षली कमांडर कवडो व त्याचा सहकारी गणपत कोल्हे या दोघांनाही अटक करण्यात गडचिरोली पोलिस दलाला यश आले आहे. नक्षल कमांडर कवडो याच्यावर १६ लाखांचे बक्षीस होते. शिवाय २२ चकमकीत व आठ हत्यांमध्येही त्याचा प्रत्यक्ष सहभाग आहे. नागपुरमधील रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

उपविभाग धानोरा अंतर्गत पोलिस मदत केंद्र कटेझरी येथील पोलिस पथक नक्षलविरोधी अभियान राबवत असताना २९ मार्च रोजी खोब्रामेंढा-हेटाळकसा येथे झालेल्या पोलिस-नक्षल चकमकीत जखमी झालेला जहाल नक्षलवादी टिपागड दलम डीव्हीसी किशोर उर्फ गोंगलू उर्फ सोबू घिसू कवडो (३८) रा. रामनटोला, ता.एटापल्ली याला पकडण्यात कटेझरी पोलिस पथकाला यश मिळाले आहे. जहाल नक्षली किशोर कवडो याच्या पायाला खोब्रामेंढातील चकमकीदरम्यान बंदुकीची गोळी लागल्याने तो जखमी झाला होता. यानंतर त्याला जखमी अवस्थेत सोडून नक्षलवादी जंगलातून पळून गेले होते. किशोर कवडोचा २२ चकमकीत समावेश असून, ८ खून व ६ जाळपोळीचा घटना तसेच अन्य सहा गुन्ह्यामध्ये सहभाग आहे. त्याच्यासोबत त्याला मदत करणारा नक्षल समर्थक गणपत कोल्हे यालादेखील पोलिसांनी अटक केली आहे.

पायाला गोळी लागल्याने जखमी
६ एप्रिल रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी धानोरा व कटेझरी पोलीस पथकाला, गणपत कोल्हे या नक्षल समर्थकाच्या मदतीने किशोर कवडो लपून बसला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर कटेझरी पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान राबवून मोठ्या शिताफीने किशोर कवडो याला अटक केली. त्याच्या पायाला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याने नागपुरातील रूग्णालयात त्याला दाखल करण्यात आले आहे.

रेमडेसिवीरवर निर्यातबंदी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या