24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeमहाराष्ट्रएनसीबीची कारवाई खोटी

एनसीबीची कारवाई खोटी

एकमत ऑनलाईन

मुंबई – कॉर्टेलिया क्रूझवर एनसीबीने जो छापा मारला त्याच्यावरून महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केला आहे. त्यांनी केलेल्या खुलाशामुळे वेगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत. त्यांच्या आरोपामुळे एनसीबीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. कारवाईतून एनसीबीच्या हाती काय आले, किती जणांना अटक झाली, याची खरी माहिती समोर यावी. त्या कारवाईमध्ये अधिका-यांशिवाय इतरांचाही सहभाग होता असे दिसून आले आहे. त्याविषयी त्या अधिका-यांनी माहिती द्यावी. खोटी कारवाई करून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप मलिक यांनी यावेळी केला.

पत्रकार परिषदेमध्ये मलिक म्हणाले, एनसीबीने जी कारवाई केली ती खोटी आहे असे म्हणावे लागेल. त्यांनी या कारवाईचे जे फोटो व्हायरल केले ते खरेच क्रूझवरचे होते याचे पुरावेही त्यांनी द्यावेत. या प्रकरणात मनीष भानुशाली कोण आहे याचीही माहिती मिळायला हवी. कारण त्या प्रकरणामध्ये तोच पुढे होता. त्यामुळे या प्रकरणात संबंधित व्यक्तींच्या जवळ असणारा मनीष भानुशाली कोण आहे याचाही उलगडा व्हायला हवा. यावेळी के. पी. गोस्वामी व्यक्तीच्या नावाचा उल्लेखही केला. अधिकारी अशा व्यक्तींच्या माध्यमातून खंडणी घेते का, असा सवालही मलिक यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

एनसीबीने दावा केला की त्यांनी २६ अधिका-यांनी छापा टाकला. प्रत्यक्षात आठ ते दहा जण त्यावेळी उपस्थित होते. अधिकारी काहीही माहिती देतात. नेमकी किती लोक होते. यावेळी त्यांनी काही व्हीडीओ शेअर केले.
एनसीबीने काही फोटो शेअर केले आहेत. त्यात सांगितले त्यात चरस, कोकेन, केमिकल आणि गोळ्या आहेत. ते जप्त केले आहेत. कोणत्याही कारवाईमध्ये काय जप्त करायचे याचे काही नियम आहेत. मात्र त्याचे पालन झाले नाही, असा आरोपही मलिक यांनी यावेळी केला.

भाजपशी संबधित ‘ते’ दोघे अधिकारी?
तीन तारखेचा सगळा छापा हा एकतर बनावट आहे किंवा माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. तीन तारखेचा ड्रामा खोटा असल्याचा दावा त्यांनी केलाय. एनसीबीचा वापर भाजप लोकांना बदनाम करण्यासाठी करत आहे.

‘ते दोघे’ कोण? एनसीबीने स्पष्ट करावे
तीन तारखेच्या रात्री मुंबई-गोवा क्रूझ पाण्यात असतानाच त्याच्यावर छापा टाकण्यात आला. त्यानंतर सांगण्यात आले की यात बड्या स्टारचा मुलगा आहे. यामध्ये ज्या लोकांना ताब्यात घेतले त्यांचा व्हीडीओ रिलीज करण्यात आला. एक टकला व्यक्ती ताब्यात घेऊन जाताना दिसत आहे. त्यानंतर हाच व्यक्ती एका सेल्फीमधून व्हायरल झाला. त्याचा आर्यन खानसोबत हा फोटो दिसून आला. एएनआयने अशी बातमी दिली की, हा एनसीबीचा अधिकारी नाहीये. तर हाच मोठा प्रश्न आहे की, हा कोण आहे? जर तो अधिकारी नसेल तर एखाद्याला ताब्यात कसे घेऊन जाऊ शकतो? या व्यक्तीचे आणि एनसीबीचे काय कनेक्शन आहे हे एनसीबीने स्पष्ट करायला हवे.

बातम्या प्लांट करण्यात आल्या
एएनआयने असा व्हीडीओ रिलीज केला की ज्यामध्ये अरबाज मर्चंटला घेऊन जाताना दिसून आले. पहिल्या व्यक्तीचं नाव आहे के. पी. गोसावी तर मनीष भानुशाली हे दुस-या व्यक्तीचे नाव आहे. तोही एनसीबीचा अधिकारी नाहीये. तर तो भाजपचा जिल्हा उपाध्यक्ष आहे. त्याचा फोटो देशाच्या पंतप्रधानांसोबत फोटो आहे, अमित शहांसोबत आहे, देवेंद्र फडणवीसांसोबत आहे. गुजरातच्या अनेक नेत्यांसोबत आहे. भाजपच्या अनेक पदाधिका-यांसमवेत आहे. एनसीबीने हे स्पष्ट करावे की, हे दोघे कोण आहेत आणि यांचा तुमच्याशी काय संबंध आहे?

जप्त करण्याची प्रक्रिया असते
जे जप्त केले त्याचे फोटो जाहीर करण्यात आले. बातमी अशी प्लांट केली की, क्रूझवरून लोकांना ताब्यात घेतले. तसेच हे तिथून जप्त करण्यात आल्याचा दावा केला गेला. मात्र हे फोटो क्रूझवरचे नसून दिल्ली ऑफिसमधील आहेत, असा दावा मलिक यांनी केलाय. छापेमारीची एक प्रोसिजर असते. जे काही जप्त केलंय त्याला जप्त करण्याची प्रक्रिया असते. क्रूझवर काहीही जप्त करण्यात आले नसल्याचे व्हीडीओमधून स्पष्ट होतेय, असा दावा त्यांनी केलाय.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या