24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्र‘५० खोके, एकदम ओके’ टी शर्टचे होणार राष्ट्रवादीकडून वाटप

‘५० खोके, एकदम ओके’ टी शर्टचे होणार राष्ट्रवादीकडून वाटप

एकमत ऑनलाईन

जळगाव : राज्याच्या राजकारणात सध्या एका घोषणेने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधिमंडळाच्या पाय-यांवर ‘५० खोके, एकदम ओके’ अशी घोषणाबाजी करत महाविकास आघाडीतील आमदारांनी भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला. या घोषणांनी घायाळ झालेल्या सत्ताधा-यांकडून पलटवार करण्याचा प्रयत्न झाला. मात्र आता याच घोषणेवरून राष्ट्रवादी राज्यभरात रान उठवण्याची शक्यता निर्माण झाली असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीतच पदाधिका-यांनी याबाबत मागणी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र भैय्या पाटील, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यासह सर्व माजी आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पदाधिका-यांची मागणी
‘५० खोके, एकदम ओके’ अशा आशयाचे टी शर्ट छापून त्याचे प्रत्येक मतदारसंघात वाटप करण्यात यावे, अशा सूचना राष्ट्रवादीच्या बैठकीत काही पदाधिका-यांकडून करण्यात आल्या. या सूचनांचे जयंत पाटील यांनी कौतुक करत अशा पद्धतीनेच स्थानिक पातळीवर रान पेटवायला सुरुवात केली पाहिजे, असे आवाहन केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या