29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबै बँकेत दरेकरांना धक्का, आघाडीची सत्ता, राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे नवे अध्यक्ष

मुंबै बँकेत दरेकरांना धक्का, आघाडीची सत्ता, राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे नवे अध्यक्ष

एकमत ऑनलाईन

मुंबई : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचे वर्चस्व असलेल्या मुंबई जिल्हा बँकेवर आघाडीचा झेंडा फडकला आहे. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सिद्धार्थ कांबळे यांनी भाजपाच्या प्रसाद लाड यांचा दोन मतांनी पराभव केला. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र भाजपच्या विठ्ठल भोसले व शिवसेनेच्या अभिषेक घोसाळकर यांना समान मते मिळाली व ईश्वर चिठ्ठीवर विठ्ठल भोसले निवडून आले.

मुंबई जिल्हा बँकेवर गेली अनेक वर्षे दरेकर यांचे वर्चस्व आहे. मात्र यावेळी त्यांच्या हातातील बँकेची सूत्रे काढून घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. शिवसेना युवा नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे स्वत: या निवडणुकीची सूत्रे हाताळत होते. या निवडणुकीत दरेकर यांच्या सर्वपक्षीय पॅनलला बहुमत मिळाले होते. पण महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी नंतर एकत्र येऊन दरेकरांना धक्का दिला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे विजयी झाले. त्यांनी भाजपच्या प्रसाद लाड यांचा पराभव केला. सिद्धार्थ कांबळे यांना ११ तर भाजपच्या प्रसाद लाड यांना ९ मते मिळाली.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली असली तरी उपाध्यक्षपद मात्र भाजपला मिळाले आहे. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना समान, म्हणजे प्रत्येकी दहा मते मिळाली. भाजपचे विठ्ठल भोसले व शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर यांच्यात थेट लढत झाली. दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाल्याने चिठ्ठी टाकून उपाध्यक्षपदाची निवड करण्यात आली व यात भाजपचे विठ्ठल भोसले निवडून आले.
१९ पैकी ११ सदस्य
राष्ट्रवादी-सेनेच्या बाजूने
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यामुळे ११ संचालक सदस्य संख्या झाली, तर भाजपकडे ९ संचालक संख्या होती. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पारड्यात जास्त मत पडली. त्यामुळे राष्ट्रवादी-शिवसेनेने बाजी मारली.
ऐनवेळी दरेकर यांची माघार शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे दरेकरांचा पराभव अटळ झाला होता. त्यामुळे पराभव दिसताच विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. भाजपने अचानक त्यांचा उमेदवार बदलून प्रसाद लाड यांना अध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली होती.

पाठीत खंजीर, सत्तेचा गैरवापर !
याबाबत प्रवीण दरेकर यांनी आघाडीच्या नेत्यांनी राज्यातील सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला. निवडणुकीत आम्हाला बहुमत मिळाले होते, पण निवडून आलेल्या लोकांवर दबाव आणून खंजीर खुपसण्यात आला. २०१९ ला राज्यात जे झाले, तेच आता बँकेत झाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालून दबाव आणल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान शिवसेनेला एक वर्ष अध्यक्षपद देण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या