24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeमहाराष्ट्र‘भारत बंद’ला राष्ट्रवादीचा पाठिंबा : पाटील

‘भारत बंद’ला राष्ट्रवादीचा पाठिंबा : पाटील

एकमत ऑनलाईन

परभणी: देशातील विविध संघटनांनी येत्या २७ सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या बंदला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा या भारत बंदला संपूर्ण पाठिंबा असणार असून या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं आहे. जयंत पाटील यांनी परभणीत आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हे आवाहन केले. देशभरातील १००पेक्षा जास्त संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत हा बंद चालणार आहे. या बंदला आमचा पांिठबा असून आम्ही बंदमध्ये सहभागी होऊ, असं पाटील यांनी सांगितलं. यावेळी पत्रकार परिषदेला खासदार फौजिया खान उपस्थित होत्या.

जयंत पाटील यांनी शुक्रवार रोजी परभणीत जिल्ह्यातील जलसंपदा विभागाची आढावा बैठकही घेतली. मराठवाड्यात ब-याच ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने अनेक प्रकल्पांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त प्रकल्पांची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांचे व शेतक-यांच्या जमिनींचे तात्काळ पंचनामे करून नागरिकांना दिलासा देण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांना केल्या असल्याची माहितीही त्यांनी दिली.

विविध प्रकल्पांचा आढावा
या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. अनेक प्रकल्पांची दुरुस्ती, कालव्यांची दुरुस्ती व इतर प्रलंबित कामे पूर्ण करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली. लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील ममदापूर, जोड परळी, कोटा आणि पिंपळगाव कुटे हे नवे बंधारे पाणी उपलब्धतेअभावी प्रलंबित होते मात्र आता हा प्रश्न सोडवण्यात आला आहे. त्यामुळे आता हे प्रस्तावित बंधारे पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे ते म्हणाले.

कालवे अत्याधुनिक करणार
जायकवाडी डावा आणि उजवा कालव्याची वाहन क्षमता कमी झाली आहे. ही गोष्ट गांभीर्याने घेत या कालव्यांची सुधारणा केली जाईल व आधुनिकीकरण केले जाईल. उच्च दर्जाचे काम करत हे कालवे अत्याधुनिक केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार फौजिया खान, खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वडपूरकर, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार राहुल पाटील, जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि जलसंपदा विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या