36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeमहाराष्ट्रनीट २०२० परीक्षेचा निकाल जाहीर

नीट २०२० परीक्षेचा निकाल जाहीर

एकमत ऑनलाईन

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट यूजी २०२० परीक्षेचा निकाल जाहीर केला असून सदरील निकाल एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर nta.neet.in पाहता येणार आहे. देशातील एमबीबीएस, बीडीएस या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ही प्रवेश परीक्षा घेतली जाते.

१३ सप्टेंबर रोजी झालेल्या या परीक्षेसाठी सुमारे १५.९७ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८५ ते ९० टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ऐन कोविड -१९ संक्रमण काळात झालेल्या या परीक्षेच्या वेळी आरोग्यविषयक सर्व खबरदारी घेण्यात आली होती.

निकाल पाहण्यासाठी
एनटीएची अधिकृत वेबसाईट ntaneet.nic.in वर जा
यानंतर निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
नीट अप्लिकेशन क्रमांक, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन टाकून सबमिट करा.
नीट २०२० निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

अंतिम उत्तरतालिकाही जाहीर
दरम्यान, नीटचा निकाल जाहीर होण्याआधी सुमारे अर्ध्या तासापूर्वी एनटीएने नीटची अंतिम उत्तरतालिका देखील जारी केली. अंतिम उत्तरतालिका एनटीएचे अधिकृत संकेतस्थळ ntaneet.nic.in वर जारी करण्यात आली आहे. ही उत्तरतालिका डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंक या वृत्तात पुढे देत आहोत.

दोन वेळा झाली होती परीक्षा
ज्या विद्यार्थ्यांना कोविड-१९ संसर्ग किंवा कंटेन्मेंट झोनमध्ये असल्याकारणाने परीक्षा देता आली नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा घेण्यात आली. अशा सुमारे २९० विद्यार्थ्यांनी १४ ऑक्टोबर २०२० रोजी परीक्षा दिली.

मुलींच्या लग्नाच्या योग्य वयाबाबत लवकरच निर्णय

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या