24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रआमदारांच्या वर्तनासाठी विधामंडळाची नवी समिती

आमदारांच्या वर्तनासाठी विधामंडळाची नवी समिती

एकमत ऑनलाईन

पुणे : राज्यात सत्तांतर होवो अथवा पक्षांतर. लोकप्रतिनिधींमध्ये मतभेद असले तरी, मनभेद होऊ नये. त्याचे प्रतिबिंब विधी मंडळात पडू नये, यासाठी आमदारांच्या वर्तणूक नियमावलीत सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने समिती नियुक्त केली असून ती एक महिन्यांत अहवाल देणार असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी रविवारी येथे दिली.

विधी मंडळाच्या १८ ते २५ ऑगस्ट दरम्यान झालेल्या अधिवेशनातील कामकाजांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. गो-हे बोलत होत्या. आमदारांची सभागृहाबाहेरील आंदोलने, घोषणाबाजी कामकाजापेक्षा यंदा जास्त गाजल्या, त्या बाबत विचारणा केली असता त्या म्हणाल्या, लोकशाहीमध्ये प्रत्येक लोकप्रतिनिधीला आंदोलन करण्याचा हक्क आहे. मात्र, विधीमंडळाच्या आवारात, सभागृहात त्याचे वर्तन कसे असावे, या बाबत नियमावली आहे.

मात्र, त्याचे उल्लंघन घालून कोणी आवाज काढतात, तर कोणी शिर्षासन घालतात, चुकीच्या पद्धतीने वागतात, हे बरोबर नाही. त्यामुळे सुधारित नियमावली तयार करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व पक्षांचे गटनेते आदींचा समावेश आहे. विधानसभेचे सभापती अ‍ॅड. राहुल नार्वेकर समितीचे अध्यक्ष तर, मी सहअध्यक्ष असेल. ही समिती एक महिन्यांत अहवाल सादर करेल. अधिवेशनात ७ महत्त्वाची विधेयके मंजूर झाली. राजकीय घडामोडी अनेक घडत असल्या तरी, त्याचा परिणाम कामकाजावर झाला नाही. कामकाजही चांगल्या पद्धतीने झाले.

या बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्य केले. तसेच महिला अत्याचाराच्या घटनांवर कठोर कारवाई करण्यासाठी तयार केलेला ‘शक्ती’ कायदा मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे आहे. त्यासाठी महिला खासदारांची मदत घेऊन त्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असेही डॉ. गो-हे यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या