बीड : कोरोनाचा कहर देशभरात वाढत आहे. मृत्यूचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतातील स्थिती तशी बरी असली तरी संकट हे टळलेले नाही. दररोज कोरोनाशी कसे लढायचे याबद्दल सांगितले जात आहे. काळजी कशी घ्यावी हे सांगितले जात आहे. सर्वसामान्य लोक ज्या एटिएममध्ये जातात तेथील नोटा तरी सुरक्षित आहेत का असा प्रश्न सामान्यांना पडत आहे.
ग्राहकांची पर्यायाने देशाची काळजी
बॅँकेत जाण्यापूर्वी सॅनिटायझरने हात स्वच्छ केल्याशिवाय प्रवेश नाकारला जातो. काळजी घेतली जात आहे. मात्र आता बॅँकेनेच स्वत: ग्राहकांची पर्यायाने देशाची काळजी घेण्यासाठी दोन हात करायला सुरूवात केली आहे. बीड येथील जालना मर्चंट को.आॅप. लि. बॅँकेच्या बीड येथील शाखेत नवा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी संपूर्ण नोटा मशिनमध्ये सॅनिटाईझ करूनच बाहेर पडत आहेत.
या नोटा हातात पडल्यानंतर त्या निश्चितच सुरक्षित असतील
ग्राहकांच्या हातात या नोटा पडल्यानंतर त्या निश्चितच सुरक्षित असतील असे बॅँकेच्या अधिकाºयांनी सांगितले. या ठिकाणी हा प्रयोग सुरू झाल्यानंतर ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. बीड येथील या शाखेचे आनंद पारिख यांनी या संदर्भात माहिती दिली.
Read More मोठा दिलासा : जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास ६ महिन्याची मुदतवाढ