24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeमहाराष्ट्रसिमेंट उद्योगातील कामगारांना नवीन किमान वेतनश्रेणी : मुश्रीफ

सिमेंट उद्योगातील कामगारांना नवीन किमान वेतनश्रेणी : मुश्रीफ

एकमत ऑनलाईन

मुंबई : सिमेंट उद्योग आणि सिमेंटवर आधारित उद्योगातील कामगारांच्या हितासंदर्भात चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेली मागणी लक्षात घेऊन यासंदर्भातील परिपत्रकात बदल करून या उद्योगातील कामगारांना नवीन किमान वेतन लागू करणारे परिपत्रक काढणे तसेच कामगारांना २१ हजार रुपये किमान वेतन लागू करण्यासंदर्भात तत्वत: मान्यता देण्यात येत असल्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

सिमेंट उद्योग आणि सिमेंटवर आधारित उद्योग यातील कामगारांना किमान समान वेतन लागू करण्यात आलेले आहे. सिमेंट उद्योगात काम करणाºया कामगारांना सध्या अल्प वेतन मिळत आहे. त्यामुळे या परिपत्रकात बदल करून किमान वेतन यादीमध्ये दुरुस्ती करावी आणि सिमेंट उद्योगातील कामगारांना एकवीस हजार रुपये किमान वेतन देण्यात यावे अशी मागणी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती.

मंत्रालयात कामगार मंत्री मुश्रीफ यांच्या दालनात सिमेंट उद्योगातील कामगारांना किमान वेतनवाढ करण्यासंदर्भातील परिपत्रकात दुरुस्ती करून कामगारांना किमान नवीन वेतनश्रेणी लागू करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

वडेट्टीवार म्हणाले, वाढती महागाई लक्षात घेता श्रमिकांना जीवन जगताना अडचणी येत आहेत. कामगारांना कोणत्याही परिस्थितीत योग्य किमान वेतन मिळणे आवश्यक आहे. सध्या कोरोनामुळे कामगार वर्ग अडचणीत आहे. त्यांना दिलासा देणे आवश्यक आहे.

ओबीसी आरक्षणासाठी केंद्राचे सहकार्य आवश्यक, भुजबळांनी घेतली फडनवीसांची भेट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या