24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रसोमवारी नव्या मंत्र्यांचा शपथविधी शक्य

सोमवारी नव्या मंत्र्यांचा शपथविधी शक्य

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली.

गृहमंत्रालय हे पद कोणाला मिळणार यावरही बैठकीत चर्चा झाली. गृहमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस नव्हे, तर चंद्रकांत पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याचे कळते.

मागच्या सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. तेव्हा गृहमंत्रीही तेच होते. आता फडणवीसांच्या जागी चंद्रकांत पाटील यांना हे खाते मिळण्याची शक्यता आहे. गृहखात्याबरोबरच अर्थखात्यावरही भाजपची नजर आहे. चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यास प्रदेशाध्यक्षपदी एखाद्या ओबीसी नेत्याची नियुक्ती होऊ शकते.

शिवसेनेचे ४० आमदार आणि सुमारे ५० अपक्षांच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेतली. त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडले आणि राज्यात नवे सरकार दिले. शपथविधी सोहळा होऊन आठवडा उलटला तरी मंत्र्यांनी अद्याप शपथ घेतली नाही.

सोमवारी शपथविधी?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. सोमवारी सकाळी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाला १३ मंत्रीपद!
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नजरा ओबीसी व्होट बँकेवर लागल्या आहेत. अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि विभागांचे विभाजन निश्चित करण्यात आले. शिंदे गटाला १३ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या