सातारा : सातार जिल्ह्यातील माण तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून प्रियकराने नवविवाहितेची हत्या केली. प्रेयसीच्या हत्येनंतर त्याने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मान तालुक्यातील वांझोळी गावात ही घटना घडली असून, या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे
स्रेहल वैभव माळी असे हत्या झालेल्या विवाहीतेचे नाव आहे. तर दत्तात्रय सुरेश माळी असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. स्रेहल लग्न झाल्यानंतर दोन महिन्यांनी आपल्या माहेरी आली होती. हीच संधी साधून आरोपीने स्रेहलची हत्या केली आणि नंतर गळफास घेतला.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, दत्तात्रय सुरेश माळी आणि स्रेहल यांचे एकोमंकांवर प्रेम होते. मात्र स्रेहलच्या घरच्यांनी तिचं लग्न दुसरीकडे लावू दिलं. लग्नानंतर दोन महिन्यांनी स्रेहल ही आपल्या माहेरी वांझोळीत आली होती.
दत्तात्रय माळी आणि स्रेहलचे घर हाकेच्या अंतरावरच आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास दत्तात्रय याने स्रेहलला आपल्या घरी बोलावले. स्रेहलही त्याच्या घरी गेली. मात्र घरी कोणी नसल्याचं बघून दत्तात्रय याने स्रेहलवर धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर त्याने त्याच घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.