मुंबई : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपनेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. भाजपच्या नादाला लागून राणे हास्यास्पद आरोप करत आहेत. आता त्यांना कोर्टात उत्तर द्यावे लागेल, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.
संजय राऊत यांनी पाठवलेल्या नोटिसीनंतर भाजप नेते निलेश राणे आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहेत. त्यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘संजय राऊत यांनी राणेसाहेबांवर बदनामीचा दावा दाखल केला आहे. मुळात बदनामीचा दावा दाखल करायला मार्केटमध्ये कसलीतरी इज्जत असावी लागते’ असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.
निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी नारायण राणे यांना पाठवलेल्या नोटिसीनंतर निलेश राणे आक्रमक झाले आहेत. ‘संजय राऊत यांनी राणेसाहेबांवर बदनामीचा दावा दाखल केला आहे. मुळात बदनामीचा दावा दाखल करायला मार्केटमध्ये कसलीतरी इज्जत असावी लागते’ असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.