मुंबई : तब्बल ३२ वर्षांच्या शानदार कामगिरी नंतर भारतीय नौदलातील युद्धनौका आयएनएस निशंक आणि आयएनएस अक्षय सेवेतून निवृत्त होतायत. आज मुंबईच्या डॉकयार्डवर सेवानिवृत्त होत आहे. पश्चिम नौसैनिक कमांडने आज ट्वीट करत ही माहीती दिली आहे. २२ मिसाईल वेस स्कॉड्रन आणि २३ पेट्रोल आयएनएस निशंक ३२ वर्षांच्या सेवेतून नौदलातून निवृत्त होईल.
जॉर्जियामधील पोटी बंदरावर या दोन्ही युद्धनौकांची निर्मिती झाली होती. या दोन्ही नौका अतिशय महत्वाच्या मोहीमेत सहभागी झालेल्या आहेत. यात १९९९ च्या कारगिल युद्धावेळी राबविला गेलेल्या ऑपरेशन तलवारचाही समावेश होता. त्याचबरोबर संसदेवर अतिरेकी हल्ला झाला त्यानंतर राबविल्या गेलेल्या ऑपरेशन पराक्रममध्येही या युद्धनौकांचा सहभाग होता.
निशंक वीर क्लास कॉर्वेट श्रेणीतील नौका
आयएनएस निशंकचा १२ सप्टेंबर १९८९ मध्ये भारतीय नौदलात समावेश करण्यात आला होता. ही वीर क्लास कॉर्वेट युद्धनौका आहे. या युद्धनौकेची लांबी १८४ फूट असून समुद्रात ५९ किलोमीटर प्रतितास हा वेग होता. या युद्धनौकेवर आधुनिक क्षेपणास्त्र, मशीन गन आणि तोफांचाही समावेश होता.
अक्षयवर होती पाणबुडीसंबंधीत यंत्रणा
तर आयएनएस अक्षय १० डिसेंबर १९९० मध्ये नौदलात दाखल झाली होती. या यूद्धनौकेवर देखईल अत्याधुनिक शस्त्र होती तसंच, या युद्धनौकेची लांबी १८३ फूट होती तर ५२ किलोमीटर प्रतितास वेग होता. या युद्धनौकेची लांबी १८३ फूट होती तर ५२ किलोमीटर प्रतितास वेग होता. पाणबुडी शोध घेऊ शकणारी यंत्रणाही होती. तसेच पाणबुड्यांना नष्ट करू शकणारी यंत्रणा या युद्धनौकेवर होती.