मुंबई : ओरंगाबादमधील शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या सत्काराचे आयोजन केले होते. मुंबईतील रविंद्र्र नाट्य मंदिर येथे शिंदे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिंदे सरकारमधील आमदारांनी उपस्थिती लावली होती. शिंदे यांचे सरकार स्थापन झाल्यावर आमच्या मतदारसंघाला निधी मिळाला असे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले. त्याचबरोबर ही शिवसेना ओरिजनल असून यापुढे शिवसेनेचे कोणतेही नवीन वाण टिकणार नाहीत असा टोला त्यांनी लावला.
जगातल्या कोणत्याही राज्यात मुख्यमंत्री होणार नाही असा मुख्यमंत्री आपल्याला लाभला आहे. आपण कोणतीही गोष्ट लपवून करत नाही. माझ्या मतदारसंघात हिंदू मतदारांची लोकसंख्या जास्त आहे पण मला ते निवडून देतात. आपली शिवसेना ओरिजनल आहे आणि जुन्या शिवसेनेचा कोणताही वाण आला तर शिंदेच्या बाणापुढे टिकू शकणार नाही असा टोला त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना लावला आहे. शिंदे यांनी रात्री दोन वाजता माझ्या नगपालिकेसाठी २० कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यांचे उपकार मी विसरणार नाही. त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना पेन चालवण्यामध्ये अडचणी होत्या पण आता ती अडचण शिंदे यांनी सोडवली आहे. त्यांच्या उपकाराची परतफेड आम्ही करू शकत नाही असेही ते यावेळी म्हणाले.