पुणे : पुणे शहराचा आवाका दिवसेंदिवस वाढतो आहे. त्याच प्रमाणात शहरातील दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. मात्र याचा परिणाम पर्यावरणावर होत असून वाढत्या प्रदूषणामुळे पुणेकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. जवळपास एक दिवसात पुण्यामध्ये अंदाजे १ कोटी वेळा हॉर्न वाजवला जातो. त्यामुळे गेल्या काही वर्षांत शहरातील ध्वनिप्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. याच धर्तीवर पुण्यात काही सामाजिक संस्था व पुणे पोलिसांच्या पुढाकाराने १२ डिसेंबरला ‘नो हॉर्न’ अशी मोहीम राबवण्यात येणार आहे.
पुण्यातील लाईफ सेव्हिंग फाऊंडेशन, नवचैतन्य हास्ययोग परिवार आणि पुणे पोलिस वाहतूक विभागाकडून शहरात १२ डिसेंबर रोजी पूर्ण दिवस हॉर्न न वाजवण्याचा एक अभिनव उपक्रम साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे. या उपक्रमादरम्यान शनिवारी दुपारी वाजता टिळक चौकात प्रबोधनपर कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे, क्रीडा समालोचक सुनंदन लेले आदी उपस्थित राहणार आहेत. पुण्यात विनाकारण हॉर्न वाजवणाºयांचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्याचाच दुष्परिणाम आपल्याला नागरिकांच्या आरोग्यावर झालेला पाहायला मिळतो आहे. पुणेकरांमध्ये ब्लड प्रेशर, हृदयरोग, ताणतणाव, चिडखोरपणा, नैराश्य आणि ऐकण्याच्या समस्या वाढल्या आहेत.
नड्डा हल्ला प्रकरणात सात जणांना अटक