34.3 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeमहाराष्ट्रलॉकडाऊन नको; व्यापारी रस्त्यावर

लॉकडाऊन नको; व्यापारी रस्त्यावर

एकमत ऑनलाईन

मुंबई : कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांचा सर्वाधिक फटका अनेक व्यावसायिक, व्यापारी, दुकानदारांना बसत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक व्यापारी संघटना आता पुन्हा लागू केलेल्या मिनी लॉकडाऊनला विरोध करत आहेत. याच पार्श्वभूमीवर ऑल इंडिया ट्रेडर्स या व्यापारी संघटनेने राज्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनदरम्यान दुकानांच्या वेळा सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कराव्यात अशी मागणी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी पूर्ण लॉकडाऊन घोषित करण्याआधी व्यावसायिक, दुकानदारांचा विचार करणे गरजेचे आहे. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे कोलमडून पडतात, रोजगारचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्याआधी आधीच अडचणीत सापडलेल्या व्यापारी, उद्योजक, दुकानदारांचा विचार करणे गरजेचे असून लॉकडाऊनदरम्यान दुकानदार, व्यावसायिकांना दुकाने सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत खुले ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी व्यापारी संघटनेने केली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेत मेडिकलप्रमाणे इतर दुकाने, व्यावसायिकांचाही समावेश करावा अशी मागणी व्यापारी संघटना करत आहेत.

नागरिकांसाठी दैनंदिन जीवनात वस्तू व सेवा महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे राज्यात व्यापा-यांकडूनही मोठ्या प्रमाणात वस्तूंचा पुरवठा होत असतो. परंतु लॉकडाऊनमुळे व्यापारी आणि दुकानदारांमध्ये असणा-या साखळीला ब्रेक लागतो. याचा आर्थिक फटका दुकानदार आणि व्यापा-यांना बसत आहे. त्यामुळे राज्यातील अनके व्यापारी संघटना, उद्योजक, व्यावसायिक राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत.

खारघरमध्येही व्यापारी वर्ग रस्त्यावर
मिनी लॉकडाऊनविरोधात आता कळंबोली, खारघरमधील अनेक व्यापारी रस्त्यावर उतरून सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत आहेत. खारघरमधील नवरंग चौकात १५० ते २०० व्यापा-यांनी एकत्र येत पालिकेची गाडी अडवत दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाविरोधात जोरदार निदर्शने केली.

अहमदनगर जिल्ह्यात निर्णयाचा निषेध
मोची गल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने राज्य सरकारने केलेल्या मिनी लॉकडाऊनला मंगळवारी बंद दुकानासमोर उभे राहून व्यापारी व कामगारांनी विरोध दर्शविला. तर या निर्णयाचा निषेध नोंदवून सोमवार ते शुक्रवार सर्व नियमांचे पालन करून व्यवसाय करण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मोची गल्लीतील दुकानमालक व कामगार फिजीकल डिस्टन्ससह नियमांचे पालन करून उपस्थित होते.

नागपुरात लॉकडाऊनविरोधात तीव्र संताप
नागपुरात लॉकडाऊनला विरोध करत व्यापारी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. शाहीद चौकात व्यापारी रस्त्यावर आल्याने तणाव निर्माण झाला होता.
मंगळवारी सकाळपासून इतवारीमधील शहीद चौकातील बाजारपेठेत व्यापारी व कामगार मोठ्या संख्येने एकत्र आले आणि दुकाने सुरू केली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी दुकानं बंद करण्यास सांगितले. त्यामुळे व्यापा-यांनी शहीद चौकात विरोध करत आंदोलन केले. किराणा मालाच्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे त्याप्रमाणे आम्हालाही परवानगी दिली जावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यामध्ये सराफा व्यापारी, कपडे विक्रेते, भांडी विक्रेते अशा अनेकांनी सहभाग घेतला होता.

ठाणे, रत्नागिरीतही विरोध
ठाण्यातही व्यापा-यांकडून लॉकडाऊनला विरोध करण्यात आला. नौपाडा पोलिसांनी याप्रकरणी १० व्यापा-यांना ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे रत्नागिरीतही व्यापा-यांनी विरोध दर्शवला होता. ३० एप्रिलपर्यंत राज्यात कठोर निर्बंध लागू राहणार आहेत. या निर्बंधातून शेतीविषयक कामे, सार्वजनिक व खासगी वाहतुकीला वगळण्यात आले आहे. खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणे बंद राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी रात्रीपासून तर सोमवारी सकाळपर्यंत संपूर्ण टाळेबंदी राहणार आहे. मद्यविक्रीची सर्व दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील.

मुंबईतील दुकाने बंद ठेवणार नाही
वीकेंड लॉकडाऊनचा आदेश काढणा-या ठाकरे सरकारविरोधात राज्यातील व्यापारी संघटनेने बंडाचे निशाण फडकावले आहे. मुंबई शॉप रिटेल असोसिएशनने राज्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. दुकाने बंद राहिली तर माल सडेल. त्याची भरपाई कोण देणार? जागेचं भाडं आणि कामगारांचे पगार कोण देणार, असा सवाल फेडरेशन ऑफ रिटेल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी उपस्थित केला आहे.

पुण्यात हॉटेल व्यावसायिकांचे आंदोलन
राज्य सरकारच्या नवीन आदेशानुसार युनायटेड हॉस्पिलिटी असोसिएशन या हॉटेल व्यावसायिकांच्या संघाने देखील लॉकडाऊन चा जाहीर निषेध केला. पुण्यात मंगळवारी (दि. ६) युनायटेड हॉस्पिलिटी असोसिएशनच्या वतीने पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे मूक आंदोलन करण्यात आले.

माजी मुख्यमंत्री चव्हाणांची मध्यस्थी
सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सोमवारी रात्री काढलेल्या लॉकडाऊनच्या आदेशाच्या विरोधात शहरातील व्यापारी रस्त्यावर उतरले. शहरातील मुख्य बाजारपेठेतील सराफ, कापड, हार्डवेअर, हॉटेल व्यावसायिकांनी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. व्यापा-यांच्या या मागणीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्र्यांसमोर तुमच्या समस्या मांडतो असे आश्वासन दिले आहे.

औरंगाबादमध्ये ऑक्सिजनच्या मागणीत चारपटीने वाढ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या