36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeमहाराष्ट्रमन की बात आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत,...

मन की बात आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत, सगळंच रामभरोसे – मनसेचा हल्लाबोल

एकमत ऑनलाईन

मुंबई : देशात कोरोनाची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्याही वाढतच आहे. अशातच काहींना ऑक्सिजन बेड मिळत नाही तर काहींना औषधे मिळत नाहीत अशी स्थिती आहे. तर सध्या देशात लसीकरणाचा तुटवडा जाणवतोय. देशाच्या याच परिस्थितीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांवरही हल्लाबोल केला आहे.

लसीकरण आहे पण लस नाही. खाटा आहेत पण ऑक्सिजन नाही, उपचार आहे पण औषध नाही, व्यापारी आहे पण व्यापार नाही, लोक आहेत पण नोकरी नाही, मन की बात आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत, सगळंच रामभरोसे आहे पण त्यात काहीच राम नाही.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करीत देशाच्या आणि राज्याच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करत टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, लसीकरण आहे पण लस नाही. खाटा आहेत पण ऑक्सिजन नाही, उपचार आहे पण औषध नाही, व्यापारी आहे पण व्यापार नाही, लोक आहेत पण नोकरी नाही, मन की बात आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत, सगळंच रामभरोसे आहे पण त्यात काहीच राम नाही अशा आशयाचे ट्विट करत देशपांडे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.

आरोग्यम् धनसंपदा वृद्धिंगत करा…

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या