23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रयापुढे परीक्षा ऑफलाईनच

यापुढे परीक्षा ऑफलाईनच

एकमत ऑनलाईन

मुंबई : ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा हा विद्यार्थ्यांचा सध्या सगळ््यात जवळचा प्रश्न आहे. आता आपल्याला ऑनलाईनकडून ऑफलाईनकडे जायचे आहे. महाराष्ट्र शासनानेही या निर्णयाला संमती दिली आहे. आता यापुढे राज्यात ऑफलाईन परीक्षाच होणार असल्याची माहिती उच्च-तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

ऑफलाईन परीक्षेदरम्यान विद्यार्थांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेळ वाढवून दिला आहे. आपण अभ्यास कितपत करू शकतो, असा विद्यार्थांच्या मनात न्यूनगंड होता. त्यामुळे त्यांना परीक्षेआधी प्रश्नावली देण्याचा प्रयत्न केला. कोरोनाकाळात विद्यार्थ्यांचा कल बदलला आहे. १२ वीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना सीईटी द्यायची असते. त्यामुळे ते १२ वीच्या अभ्यासाक्रमाकडे दुर्लक्ष करून सीईटीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्याचा प्रयत्न करतात.

या गोष्टीचा विचार करून पुढच्या वर्षीपासून आम्ही एक धोरणात्मक निर्णय घेत आहोत. याआधी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना हा प्रयोग झालेला होता. आता हा प्रयोग पुन्हा करणार आहोत. मेरीटसाठी १२ वी आणि सीईटीचे ५० टक्के गुण ग्रा धरले जाणार आहेत. पुढच्या वर्षीपासून सीईटी आणि १२ वीच्या गुणांना महत्त्व देण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांचा विचार करता शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा लवकरात लवकर घेण्याचे विद्यापीठांना सांगण्यात आले. तसेच निकालदेखील लवकरात लवकर लागावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांचे निकाल लवकरात लवकर जाहीर करणे आमची जबाबदारी आहे. पुढच्या वर्षी शैक्षणिक वर्ष १ सप्टेंबरला सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या