26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रगुजरातला लाभ मिळाला असेल तर तक्रार करण्याची गरज नाही

गुजरातला लाभ मिळाला असेल तर तक्रार करण्याची गरज नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणावर भाष्य करताना शरद पवार यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. जर गुजरातला लाभ मिळाला असेल तर त्याची तक्रार करण्याची गरज नाही असे पवार यांनी म्हटले आहे. तसेच कुठल्याही माणसाला घराची ओढ असते, अशा शब्दांत शरद पवारांनी मोदी-शहांवर निशाणा साधला. पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.

शरद पवार म्हणाले साधारणत: केंद्राची सत्ता हातात असण्याचे परिणाम काही राज्यांसाठी अनुकूल होत असतात. त्याप्रमाणे जर गुजरातला याचा फायदा मिळाला तर आपण काही तक्रार करण्याचे कारण नाही. नरेंद्र मोदी, अमित शहा तिथले आहेत, हे मोठे लोक आहेत त्यांच्या हातात देशाची सूत्र आहेत. त्यामुळे त्यांनी थोड जास्त लक्ष त्यांनी गुजरातकडे दिले तर आपण समजू शकतो.

कुठल्याही माणसाला घराची ओढ
तुम्ही जर मोदींचे दौरे पाहिले तर ते जास्तीत जास्त कुठल्या राज्यात जातात याचे दोन-तीन महिन्यांचे रेकॉर्ड काढले तर तुम्हाला ते कळेलच. सहाजिकच आहे की कुठल्याही माणसाला घराची ओढ असते, अशा शब्दांत पवारांनी मोदी-शहा यांच्यावर निशाणा साधला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या