मुंबई : राज्यसभेच्या मतदानावेळी मनसेचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील खूप चर्चेत आले होते. त्यांचं मत भाजपला गेल्याची खूप चर्चा होती. मात्र, काही वेळापूर्वीच प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना विधानपरिषदेच्या मतदानाबाबत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सस्पेन्स निर्माण केला आहे. कोणी गृहीत धरु नये असे राजू पाटील यांनी सांगितलं.
मागच्या वेळेस आम्ही व्यक्ती बघून मतदान केलं होतं. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही मतदान केल्याचं राजू पाटील यांनी सांगितलं.
लोकशाहीत मतदान हे पवित्र कर्तव्य आहे. एका मताचं किती महत्त्व असतं हे मागे राज्यसभेच्या निवडणुकीत पाहिलं असेल. राज साहेबांना रात्री हॉस्पिटलला भेटायला गेलो होतो. त्यांनी मला निर्देश दिल्याप्रमाणं मतदान होईल, असं यावेळी राजू पाटील यांनी स्पष्ट केलं.
त्यामुळं मनसेचं मत नेमकं कोणाला याचा सस्पेन्स कायम आहे. हे एकमेव मत खूप महत्वाचे आहे. मागच्या वेळेस आम्ही व्यक्ती बघून मतदान केलं होत असे राजू पाटील म्हणाले.