25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रकोणत्याही पक्षाला संजय राऊतांसारखा प्रवक्ता मिळू नये : केसरकर

कोणत्याही पक्षाला संजय राऊतांसारखा प्रवक्ता मिळू नये : केसरकर

एकमत ऑनलाईन

गुवाहाटी : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी गेल्या दोन-तीन दिवसांपासून बंडखोरी केलेल्या आमदारांवर जोरदार टीका केली आहे. बंडखोरी करणा-या आमदारांचे शंभर बाप आहेत, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. याबाबत देखील दीपक केसरकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. संजय राऊत यांनी आमच्या मातांचा अपमान केला आहे.

कोणत्याही पक्षाला संजय राऊत यांच्यासारखा प्रवक्ता मिळून नये. पक्षासाठी रक्त सांडलेल्या लोकांची संजय राऊत नाचक्की करतात. राऊतांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेचे नुकसान होत आहे. संजय राऊत यांच्यासारखे प्रवक्ते मिळाले तर शिवसेना कधीच वाढणार नाही. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी संजय राऊत यांना शिवसेनेतून बाहेर काढले असते.

संजय राऊतांचे आरोप आम्ही कदापी सहन करणार नाही. आमच्यामुळेच संजय राऊत राज्यसभेवर निवडून आले आहेत. त्यांनी थोडा विचार करून भाषा वापरावी. संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे अनेक मित्र तुटले असल्याचे केसरकर यावेळी म्हणाले. गरीबांसाठी काम करणारी शिवसेना म्हणून मी शिवसेनेत आलो. मला मंत्रीपद दिले म्हणजे उपकार केला नाही. आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत, असे दीपक केसरकर यांनी यावेळी म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या