25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमहाराष्ट्रनाट्यगृहांत राजकीय कार्यक्रम नको

नाट्यगृहांत राजकीय कार्यक्रम नको

एकमत ऑनलाईन

मुंबई : मराठी नाट्यसृष्टी गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अनेक दर्जेदार नाटकांचे प्रयोग सध्या सुरू आहेत. कोरोना काळात नाट्यसृष्टीला मोठा फटका बसला. मात्र, त्यानंतर नाट्यसृष्टीने पुन्हा उभारी घेतली असून दमदार नाटकांचे प्रयोग सुरू झाले आहेत. नाट्यगृह हाऊसफुल्ल होऊ लागली आहेत. अशात शनिवार आणि रविवारी नाट्यगृहांमध्ये होणा-या राजकीय, शासकीय कार्यक्रमांमुळे नाटकांच्या प्रयोग रद्द करण्याची वेळ आली आहे. या प्रश्नावर नाट्यनिर्मात्यांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे.

शनिवार आणि रविवारी नाट्यगृहात कोणताही राजकीय किंवा शासकीय कार्यक्रम नको. हे दोन दिवस नाटकांसाठीच नाट्यगृह असावे, अशी मागणी नाट्यधर्मी नाट्य निर्माता संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. राजकीय कार्यक्रमांमुळे नाटकांचे प्रयोग रद्द होतात. त्यामुळे याचा निर्मात्यांना मोठा आर्थिक फटका बसतो, अशी नाराजी निर्मात्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे.

नाट्यधर्मी नाट्य निर्माता संघाचे कार्यवाह दिलीप जाधव यांनी म्हटले आहे की, शनिवार, रविवारसाठी नाटकांच्या तारखा घेतल्या जातात. ३ महिन्यांचे वाटप केलेले असते. त्यानुसार प्रयोग लावले जातात. त्यानुसार कलाकारांच्या तारखा घेतल्या जातात. काही कलाकारांच्या वेळा फिक्स नसतात. काही कलाकार त्यांच्या दुस-या कामांत बिझी असतात. काही कलाकार एका वेळी दोन दोन नाटकांमध्ये काम करत असतात. त्यानुसार आम्ही त्यांचे शेड्यूल करतो. नाटकाच्या २-३ दिवस आधी जाहिरात आलेली असते. बुक माय शोकवर ऑनलाइन बुकिंग केले जाते. आयत्या वेळी प्रयोग रद्द झाल्याने त्यांना आम्हाला पैसे परत करावे लागतात. याचा मोठा फटका निर्मात्यांना बसतो.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या