मुंबई : वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बैठक बोलावली होती. सह्यादी अतिथीगृहावर बोलावण्यात आलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.
महावितरणच्या २४ संघटनांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली असून तीन ते चार मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून महावितरणच्या तीन्ही कंपन्यांचे खासगीकरण होणार नसून राज्य सरकार स्वत: ५० हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. दरम्यान वयोमर्यादा वाढवून कर्मचा-यांची भरती करण्यात येणार असल्याची माहितीही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.