30.1 C
Latur
Tuesday, February 7, 2023
Homeमहाराष्ट्रसंजय राऊतविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी

संजय राऊतविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी

एकमत ऑनलाईन

मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राऊत यांच्या विरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. याप्रकरणी शिवडी कोर्टात पुढची सुनावणी २४ जानेवारीला होणार आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी संजय राऊतांविरोधात मानहानीचा आरोप करत थेट कोर्टात खटला दाखल केला होता.

दोन दिवसांपूर्वी, भाजप नेते नारायण राणे यांनी संजय राऊत यांनी पुन्हा जेलवारी घडविणार असे विधान केले होते. अशातच आज राऊतांविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाणं आले आहे. मेधा सोमय्या यांनी कथित शौचालय घोटाळा प्रकरणी संजय राऊतांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे.

संजय राऊत यांनी शंभर कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप सोमय्या यांच्यावर केला होता. त्यावरून मेधा यांनी राऊत यांच्याविरोधात शिवडी कोर्टात मानहानीचा दावा केला आहे. राऊत हे मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांना जबाब नोंदवण्यासाठी हजर करण्याचे आदेश ईडीला द्यावेत अशी मागणी मेधा सोमय्या यांनी न्यायालयाकडे केली होती.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या