27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रफार मोठा फटका बसलेला नाही; प्रफुल्ल पटेल

फार मोठा फटका बसलेला नाही; प्रफुल्ल पटेल

एकमत ऑनलाईन

नागपूर : आमच्या आमदारांनी ठरल्याप्रमाणेच मतदान केले. मात्र, आम्हाला अपक्षांची चार ते पाच मते मिळाली नाहीत. तसेच एक मत अवैध ठरवले गेले. आमचे दोन आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करता आले नाही. या सर्वांचा विचार केला तर फार मोठा फटका बसलेला नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

नागपुरात आल्यावर ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ठरल्याप्रमाणेच मतदान केले. अपक्ष आणि आमच्यासोबत असलेल्या लहान पक्षांनी महाविकास आघाडीलाच मतदान केले.

महाविकास आघाडीतील नेत्यांचे मत फुटले नाही. काही लोकांची वेगळी प्रवृत्ती असू शकते. त्याच्या खोलात जावे लागेल, असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.

आमच्या पक्षाकडे ५१ मते होती. त्यांनी ठरल्यानुसारच मतदान केले. मात्र, एक मत आम्हाला जास्त मिळाले. कोणी प्रेम करणा-या व्यक्तीने ते दिले. ठरल्यानुसार काही मते संजय पवारांना दिली होती. तीन पक्षांच्या सरकारमध्ये मतभेद होऊ शकतात. ते एका पक्षाच्या सरकारमध्येही होते. नागपुरात काय सुरू आहे, सर्वांना माहिती आहे, असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या