24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रदसरा मेळावा नव्हे, टोमणे मेळावा ; शिवसेनेला मनसेने पुन्हा डिवचले

दसरा मेळावा नव्हे, टोमणे मेळावा ; शिवसेनेला मनसेने पुन्हा डिवचले

एकमत ऑनलाईन

मुंबई : दसरा मेळावा वाद रंगलेला असताना मनसे नेते गजानक काळे यांनी ट्विट करत शिवसेनेचा दसरा मेळावा नसून ‘टोमणे मेळावा’ असे संबोधले आहे. त्यांच्या या टीकेला आता शिवसेना नेमके काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर कोण घेणार यावरून सध्या राजकारण तापलेले असताना, आता मनसेने शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा डिवचले आहे. याबाबत मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत सेनेवर बोचरी टीका केली आहे.

गजानन काळे यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी शिवसेनेचा शिवाजी पार्कवरील मेळावा दसरा मेळावा नसून टोमणे मेळावा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ‘‘मुंबई मनपा आणि राज्य सरकारने शिल्लकसेनेला शिवतीर्थावर ‘टोमणे मेळावा’साठी परवानगी देऊन टाकावी. खंजीर, मर्द, मावळा, वाघनखं, गद्दार, निष्ठा यातून होणा-या मनोरंजनापासून महाराष्ट्राला वंचित ठेवू नये, असेही काळे यांनी म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या