नवी दिल्ली : कोणताही व्यक्ती जो काश्मीरमध्ये तिरंगा फडकवू इच्छित आहे, त्याला रोखले जात असेल तर मग मी तो राष्ट्रदोह मानतो, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी तिरंगा ध्वजाबद्दल केलेल्या विधनावरून, त्यांच्यावर सर्वबाजूंनी टीका होत आहे. एवढेच नाहीतर दोन दिवसांपूर्वीच पीडीपीच्या तीन नेत्यांनी देखील यावरून नाराजी व्यक्त करत, पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आता या मुद्यावरून खा. राऊत यांनी देखील मेहबुबा मुफ्ती यांच्यावर निशाणा साधला आहे. जर मेहबुबा मुफ्ती, फारुख अब्दुल्ला आणि अन्य लोकं चीनच्या मदतीने काश्मीरमध्ये कलम ३७० लागू करू इच्छित आहेत.
समान नागरी कायद्यास विरोध नाही
केंद्र सरकारने समान नागरी कायदा (सीएए ) आणायला हवा का? या प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊत यांनी सांगितले की, आम्ही या अगोदर देखील म्हटले आहे की, देशात समान नागरी कायदा लागू केला पाहिजे. जर सरकार असे काही आणत असेल, तर आम्ही त्याबाबत निर्णय घेऊ.
कोरोनामुळे मानसिक स्थिती खालावतेय