25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रआता बच्चू कडूही करणार अयोध्या वारी

आता बच्चू कडूही करणार अयोध्या वारी

एकमत ऑनलाईन

मुंबई : आता मंत्री बच्चू कडूंनीही अयोध्या वारी करणार असल्याचे जाहीर केले आहे. अमरावतीतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे.
अयोध्या दौ-यावरून मागील काही दिवसांपासून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. मनसे, शिवसेना आणि काँग्रेसच्या अयोध्या वारीच्या घोषणेनंतर अनेक राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजप खासदार ब्रिजभूषणसिंह यांनी त्यांना विरोध दर्शवला. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि अयोध्येत पाऊल ठेवावे अशी मागणी त्यांनी केली. राज्यातील मनसे, शिवसेना आणि काँग्रेसने अयोध्या वारी जाहीर केल्यानंतर आता बच्चू कडू यांनीही अयोध्येला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अमरावती बडनेरा येथे बोलत असताना त्यांनी ही घोषणा केली आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी आम्ही भारताचा तिरंगा घेऊन अयोध्येला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ते म्हणाले, मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक राज्यकर्त्यांनी अयोध्या दौ-याची घोषणा केली. आम्हीही अशाच प्रकारचा अयोध्या दौरा करणार असून त्यासाठी तिरंगा यात्रेचे आयोजन करत आहोत. तिरंगा हे हिंदुस्थानच्या एकतेचे प्रतीक आहे. त्यामुळे देशातील हिंदू-मुस्लिम ऐक्य रहावे यासाठी अयोध्येला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या