22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeमहाराष्ट्रशेतक-यांच्या खात्यात आता ७५ टक्के रक्कम जमा करा

शेतक-यांच्या खात्यात आता ७५ टक्के रक्कम जमा करा

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांत विविध जिल्ह्यांत अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतक-यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय महसूल आणि वन विभागाने २६ ऑक्टोबर २०२१ रोजी निर्गमित केला आहे. दरम्यान, यापूर्वी सरकारने १० हजार कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज जाहीर केले होते. महाराष्ट्रात जून ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे.

ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२१ या काळात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य शासनाच्या निधीमधून निश्चित केलेल्या वाढीव दरानुसार आवश्यक निधीपैकी ७५ टक्के एवढा असा एकूण २ हजार ८६० कोटी ८४ लाख ७ हजार रुपये इतका निधी विभागीय आयुक्तांमार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यात येणार आहे. नुकसीचे पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत, शेतक-यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या मराठवाड्यातील शेतक-यांना दिवाळीपूर्वी मदतीचा शब्द महाविकास आघाडी सरकारने पाळला. राज्यातील शेती पिकांच्या नुकसानापोटी देय असलेल्या मदत निधीपैकी ७५ टक्के रक्कम २ हजार ८६० कोटी रुपये शेतक-यांच्या खात्यात जमा करण्याचा आदेश निर्गमित झाला आहे. ऑगस्ट व सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बीड जिल्ह्यातील शेतक-यांना ७५ टक्के मदतनिधींपैकी मंजूर २ हजार ८६० कोटींपैकी मराठवाड्याला सर्वाधिक रक्कम मिळाली अआहे. मदतीचा पहिला हप्ता म्हणून शेतक-यांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होईल, असा विश्वास व्यक्त केला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या