22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeनांदेडआता बस्स..भव्य राम मंदिराच्या आडवे येऊ नका

आता बस्स..भव्य राम मंदिराच्या आडवे येऊ नका

भाजपचे राज्य प्रवक्ते प्रा. नेरलकर यांचा सल्ला

एकमत ऑनलाईन

नांदेड : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी भव्य राम मंदिर निर्माण कार्याचे भूमिपूजन होणार हे निश्चित झाले आणि अनेक युपीए नेत्यांनी विलाप सुरू केला आहे. महाराष्ट्राचे जाणते राजे शरद पवार हे याला अपवाद ठरले असते तरच नवल. पवार म्हणतात मंदिर बांधून कोरोना जाणार आहे असं काहींना वाटतं. आता ते काहीह्णम्हणजे नक्की कोण हे पवारांनी सांगितले नसले तरी बहुदा त्यांचा रोख महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे असावा. कारण एकूणच हे सरकार कोरोना बाबतीत काहीही ठोस काम करत नसून राम भरोसे कारभार चालवत आहेत. असा टोला भाजपा राज्य प्रवक्ते प्रा. सुनील नेरलकर यांनी मारला आहे.

शरद पवारांच्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतला तर पवार हे फार क्वचित आपल्याला विरोधी पक्षात दिसतात. त्यांची बहुतांश राजकीय वाटचाल ही सत्तेजवळ राहून सत्तेची निरनिराळी पदे अनुभवताना झाली. मग अगदी राज्याच्या मुख्यमंत्री पदापासून ते केंद्रीय संरक्षणमंत्री पदापर्यंत आणि काँग्रेस,जनसंघापासून ते आता शिवसेनेला समर्थन देण्यापर्यंत हरप्रकारची राजकीय लवचिकता दाखवत पवार हे कायम सत्तेसोबत राहिले. कारण पहिल्यापासूनच पवारांचे एकमेव साध्य सत्ता हेच होते आणि तेच आजही आहे.

पण इतकं होऊनही आश्वत्थामा प्रमाणे एक भळभळणारी जखम आजही पवारांना स्वस्थ बसू देत नाही आणि ती म्हणजे पंतप्रधान पद.वेटिंग प्रायमिनिस्टर बिरूदावली पवार गेले अनेक वर्ष मिरवत आहेत. राजकारणात पवारांपेक्षा वयाने लहान असणारे मोदी हे पवारांना मागे टाकून एकदा नाही तर दोनदा पंतप्रधान झाले. मोदींच्या या कार्यकालातील कामे,निर्णय,कारभार बघता २०२४ ला पण ते पुन्हा येणार आणि २०१९ पेक्षा जास्त जागा मिळवत येणार हे पवारांचे समर्थक, राजकीय विश्लेषक, पत्रकार यांना कळत नसले तरी पवारांना नक्की कळून चुकले आहे आणि यात ३७०, राम मंदिर सारखे निर्णय हे अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात हे पण पवार जाणतात. ५ आॅगस्ट रोजी फक्त मंदिराचे भूमिपूजन होणार नसून पवारांचे स्वप्नभंजन होणार आहे. जमिनीवर होणारे कुदळ-फावड्याचा प्रत्येक आघात हा एक प्रकारे पवारांच्या स्वप्नांवरचा आघात आहे. आणि म्हणूनच पवार वैफल्यग्रस्त झाले आहेत.

वास्तविक पवारांसकट भाजपाच्या अनेक राजकीय शत्रूंवर राजकीय आघात ठरलेले राम मंदिर हा भारतीय जनता पाटीर्साठी कधीच राजकारणाचा विषय नव्हता. २७ मे १९९६, स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी संसदेत विश्वासमत प्रस्तावावर भाषण करत होते. हे भाषण म्हणजे आजवरच्या भारताच्या संसदीय लोकशाहीच्या इतिहासातील काही सर्वोत्कृष्ट भाषणांपैकी आहे. या भाषणात अनेक मुद्द्यांवर भाष्य करणारे अटलजी राम मंदिर,कलम ३७० विषयांबद्दल सांगतात की ‘ये विषय हमारे ‘इस समय’ के कार्यक्रम में नहीं है क्यूँ की हमारे पास बहुमत नही है। अटलजींच्या या एका वाक्यातून आणि ते मांडण्याच्या त्यांच्या पद्धतीतून विचारांमधली कमालिची स्पष्टता दिसून येते आणि ही वैचारिक स्पष्टता फक्त अटलजी-अडवाणीजी किंवा मोदी-शहा यांच्यापर्यंत मर्यादित नाही तर भाजपाच्या प्रत्येक स्तराच्या कार्यकर्त्यांमधे ती स्पष्टता आहे.

पुढे नेरलकर असे म्हणतात, सत्ता हे भाजपा साठी ‘साध्य’ कधीच नव्हते पण ते साधन मात्र कायमच होते. भाजपा जेव्हा जनसंघ होता तेव्हापासून ३७० चा विरोध करत आला आहे. यासाठी जनसंघाच्या संस्थापक अध्यक्ष डॉ.मुखर्जींनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. १९८९ च्या पालमपूर राष्ट्रीय अधिवेशनात भारतीय जनता पक्षाने राम मंदिर विषयातील ठराव पारित केला आणि तेव्हापासून आजपर्यंत कधीही राम मंदिर विषय सोडलेला नाही. १९९२ साली बाबरी ढाचा जमीनदोस्त झाल्यानंतर प्रसंगी भाजपाला चार राज्यातील सरकारे गमवावी लागली होती पण तरिही राम मंदिर या विषयात पक्षाने कधीही तडजोड केलेली नाही.

शरद पवारांनी अशी किती आणि कोणती स्वप्ने स्वत:च्या देशाच्या, राज्याच्या, स्वत:पक्षाच्या हितासाठी पहिली? शरद पवारांनी आजवर जे काही पाहिले ते फक्त स्वहित होते. मग त्यासाठी कधी त्यांनी वसंत दादांच्या पाठीत खंजीर खुपसले, कधी जातीय संघर्षाला अप्रत्यक्ष खतपाणी घातले़,असा आरोप करित शरद पवार आणि त्यांचा पक्ष राष्ट्रवादी यांचे अस्तित्व काय? असा सवाल उपस्थित करून शरद पवार जेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा देवेंद्र फडणवीस हे अवघे ८-९ वर्षांचे असतील. त्या फडणवीसांच्या नेतृत्वात आज महाराष्ट्रात भाजपाने एकदा नाही तर तब्बल दोन वेळा १०० पेक्षा जास्त जागा निवडून आणल्या शरद पवारांना आपल्या ५० वर्षांपेक्षा जास्त असलेल्या राजकीय कारकिर्दीत हे किती वेळा असे करता आले.

शरद पवारांनी आजवर जे इतर पक्षांसोबत, नेत्यांसोबत केले तेच आज त्यांच्या बाबतीत घडताना दासत आहे. पवारांनी वेगवेगळ्या पक्षातील स्थानिक नेत्यांना फोडून स्वत:चा पक्ष काढला, वाढवला पण आज पवारांच्याच पक्षातले अनेक जण इतर पक्षात जाताना दिसत आहेत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडेच्या भावाला आणि पुतण्याला फोडून पक्षात घेऊन जाणाऱ्या पवारांना आज त्यांच्याच पुतण्याकडून पदोपदी शह मिळत आहे. मग कधी पुतण्याच्या मुलासाठी पवारांना स्वत:च्या खासदारकीवर पाणी सोडावं लागतं तर कधी शरद पवारांच्या नकळत स्वत: अजित पवार थेट भाजपासोबत शपथ घेताना दिसतात. वयाच्या या टप्प्यावर हे सगळं बघायला लागणे हे पवारांसाठी दुदैर्वी असले तरी ते अत्यन्त दुर्देर्वी आहे.

शरद पवार आज थकले आहेत. त्यांचे पंतप्रधान पदाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता उरलेली नाही. त्यांच्या पश्चात त्यांच्या संघटनेच्या सोडाच पण खुद्द त्यांच्या लेकीच्याही राजकीय भविष्याची शाश्वती नाही. महाराष्ट्रात आज सरकार दिसत असले आणि ते सरकार पवारांच्या डोक्याने चालत असले तरी स्वत: पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी कधी ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नाही तर ते उद्धव ठाकरेंना तो करू देतील असं कोणाला वाटत असेल तर तो माणूस एक तर भाबडा आहे ़एकूण काय तर अतिशय अंधुक राजकीय भविष्य आणि अस्थिर राजकीय वर्तमान असणाऱ्या पवारांनी कोरोना आणि राम मंदिर हे सुत‘राम’ संबंध नसणारे विषय आपसात जोडणे हे केवळ नैराश्यातून आलेले विधान तर आहेच पण सोबत पवारांच्या राजकारणाला लागलेली उतरती कळा ठळकपणे अधोरेखित करणारे आहे.असा आरोपही भाजपचे राज्य प्रवक्ते प्रा. सुनील नेरलकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात केला आहे.

Read More  शरद पवार : काहींना वाटतं मंदिर बांधून करोना जाईल

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या