32.6 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeमहाराष्ट्रआता खासगी डॉक्टरांनाही ५० लाखांचे विमा कवच

आता खासगी डॉक्टरांनाही ५० लाखांचे विमा कवच

एकमत ऑनलाईन

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांवर उपचार करताना खासगी डॉक्टरांनाही कोरोनाची लागण होत आहे. त्यात काहींना आपला जीवही गमवावा लागत आहे. मात्र, असे असताना खासगी रुग्णालयातील मृत कोरोना योद्ध्यांना ५० लाखांचा विमा लागू नसल्याने त्यांच्या कुटुंबाला पुढे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. पण आता मात्र, मृत झालेल्या खासगी डॉक्टरांच्या कुटुंबाला राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या खासगी डॉक्टरांनाही आता ५० लाखांचा विमा लागू करण्यात आला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या महाराष्ट्र शाखेने ही मागणी उचलून धरत यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू केला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

सरकारकडून पालिका रुग्णालयातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचा-यांना पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत ५० लाखांचा विमा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार या डॉक्टरांचा आणि आरोग्य कर्मचा-यांना ५० लाखांचा विमा कवच लागू आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या डॉक्टर-कर्मचा-यांना ही रक्कम दिली जाते. मात्र, त्याचवेळी राज्यभरात अनेक खासगी डॉक्टर आपल्या क्लिनिक वा खासगी रुग्णालयात कोरोना योद्धे म्हणून काम करत आहेत. पण या डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला काहीही मिळत नाही. त्यामुळे खासगी डॉक्टरांना ५० लाखांचा विमा लागू करण्याची मागणी आयएमएने उचलून धरली होती.

ही मागणी अखेर सरकारने मान्य केल्याची माहिती आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली आहे. खासगी डॉक्टरांना, त्यातही सर्व पॅथीमधील म्हणजेच ऑलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक, युनानी अशा सर्व डॉक्टरांना ५० लाखांचा विमा लागू करण्यात आल्या आहे. तर यासंबंधीचा अध्यादेश ही नुकताच आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आल्याचेही डॉ. भोंडवे यांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे आता खासगी डॉक्टरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पीककर्जासाठी राष्ट्रीय,इतर बँकांचा हात आखडता

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या