28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeमहाराष्ट्रआता सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती

आता सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती

एकमत ऑनलाईन

मुंबई : शासकीय नोकरीमधील पदोन्नतीमधील आरक्षण सेवाज्येष्ठतेनुसार म्हणजेच २५ जून २००४ च्या नियमानुसार करण्यास मंजुरी देणारा जीआर राज्य सरकारने काढला आहे. त्यामुळे शासकीय सेवेतील पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या निर्णयामुळे मागासवर्गीय अधिका-यांत नाराजी आहे. कारण २००४ नंतर शासनात रूजू झालेल्या मागासवर्गीय कर्मचा-यांना आता खुल्या वर्गातील सेवाज्येष्ठतानुसारच नोकरीत बढती मिळणार आहे.

फडणवीस सरकारच्या काळात अर्थात २०१७ मध्ये उच्च न्यायालयाने पदोन्नतीमधील आरक्षण रद्द केले होते, तेव्हापासून पदोन्नतीमधील आरक्षण थांबवण्यात आले होते. हे प्रकरण सर्वोच न्यायालयात सुनावणीसाठी आहे. या सर्व बाबी पाहता २५ जून २००४ च्या पूर्वी ज्या पद्धतीने आरक्षण होते, त्या सेवाजेष्ठतेनुसार करावे याबाबत सरकारने निर्णय घेतला आहे. पदोन्नतीमध्ये बिंदू नामावलीचा जो प्राधान्य क्रम होता तो रद्द केला आहे. पदोन्नतीचा कायदा २००४ ला झाला. या कायद्यात बिंदू नामावलीनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती असा प्राधान्यक्रम होता. हे प्रकरण नंतर न्यायालयात गेले होते.

मॅटने निकाल देत पदोन्नती आरक्षण रद्द केले होते. उच्च न्यायालयानेदेखील २०१७ मध्ये पदोन्नती आरक्षण रद्द ठरवले होते, हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली नसल्याने पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे दि. २५ एप्रिल २००४ च्या स्थितीनुसारच सेवाजेष्ठतेनुसार भरण्यात येणार आहेत, असे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले. तसा जीआर जारी केल्याने यासंबंधीचा मार्ग मोकळा झाला आहे.

मागासवर्गीयांची राखीव पदेही खुल्या पद्धतीने भरणार
प्रशासनातील पदोन्नतीमधील मागासवर्गीयांसाठीची राखीव ३३ टक्के पदेही आता खुल्या पद्धतीने भरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याला मागासवर्गीयांमधून तीव्र विरोध होत आहे, तर मराठा महासंघाने या शासन निर्णयाचे स्वागत केले आहे. उच्च न्यायालयाने पदोन्नतीमधील मागासवर्गीयांचे आरक्षण रद्दबातल ठरवल्याने हा निर्णय घेतला तर हा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही शासनाने पदोन्नतीमधील ३३ टक्के पदे खुली का केली, असा सवाल मागासवर्गीय संघटनांनी केला आहे. यासंदर्भात मागासवर्गातील अनेक अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणात नाराज आहे.

किरकोळ भांडणावरून एकाचा डोक्यात काठी घालून खून

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या