33.7 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home महाराष्ट्र आता आवाजावरून कोरोना चाचणी!

आता आवाजावरून कोरोना चाचणी!

एकमत ऑनलाईन

मुंबई : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देशभरात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. राज्यात दररोज कोरोनाचा वाढता आकडा चिंता वाढवणारा आहे. त्यामुळे राज्य सरकार कोरोना चाचणीसाठी नवीन तंत्रज्ञानाची मदत घेणार असून, आता आवाजाच्या सहाय्याने कोरोनाची चाचणी करण्यात येणार आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य प्रशासन व राज्य सरकारकडून अनेक खबरदारीचे उपाय राबवण्यात येत असतानाच मुंबई महानगरपालिका एआय तंत्रज्ञानानुसार फक्त आवाजाच्या माध्यमातून कोविड टेस्टचे परीक्षण करणार असल्याचे पर्यावरणमंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

त्यांनी तसे ट्विटही केले आहे. राज्यात कोरोनावर मात करण्यासाठी व्हॉइस सॅम्पल टेस्टिंग हे एक नवे माध्यम ठरेल. अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. या नव्या प्रयोगात ध्वनी लहरींवरून कोरोना पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असल्याचे निदान केले जाऊ शकते.

केवळ ३० मिनिटांत रिपोर्ट
कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन त्याचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर टेस्ट आणि त्याचा रिपोर्ट लवकर मिळविण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सुरुवातीला स्वॅब घेऊन चाचण्या घेण्यात आल्या. त्याला लागणारा विलंब पाहता रॅपिड टेस्ट सुरू झाल्या. तसेच आता ध्वनी लहरींच्या आधारे चाचण्या घेण्यात येणार आहेत. या चाचणीमुळे केवळ ३० मिनिटांत कोरोनाची लागण झाली आहे की नाही, याचे निदान स्पष्ट होणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

पेपर रिचेकिंग करताच विद्यार्थिनीला १०० पैकी १०० गुण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या