22.6 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home महाराष्ट्र आता सरकारला शॉक द्यावा लागेल -राज ठाकरे

आता सरकारला शॉक द्यावा लागेल -राज ठाकरे

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) कोरोनाचे संकट असतानाही सरकारचे डोळे उघडावेत यासाठी आमच्यावर रस्‍त्‍यावर उतरून आंदोलन करण्याची, मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. राज्‍य सरकार जर जनतेला वाढीव वीजबीलाचा शॉक देणार असेल तर आम्‍हाला पण जनतेच्या वतीने सरकारला शॉक दयावा लागेल, असा इशारा , मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. जनतेने वाढीव वीजबीले भरू नयेत, कोणी वीज तोडायला आले तर मनसे कार्यकर्त्यांशी संघर्ष करावा लागेल, असा गर्भित इशारा देताना, सरकारने देखील समंजस भूमिका घेऊन वीजबीलांत सवलत द्यावी, असे आवाहन राज ठाकरे यांनी केली.मनसेने वाढीव वीजबीलांविरोधात राज्‍यभर आंदोलन केले.

वाढीव वीजबीलांविरोधात मनसेने आज राज्‍यभर आंदोलन केले. मुंबईत वांद्रे येथे बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्‍वाखाली मनसेने आंदोलन केले. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आदी विविध ठिकाणी मनसेच्या वतीने जोरदार आंदोलने करण्यात आली.पोलिसांनी यावेळी मनसे कार्यकर्त्याना ताब्‍यात घेतले. वाढीव वीजबिलात सवलत देण्याची मागणी करणारे राज ठाकरे यांचे पत्र जिल्‍हाधिका-यांना देण्यात आले.

वाढीव वीजबील भरू नका,मनसे तुमच्या सोबत ! -राज ठाकरे
जिल्‍हाधिका-यांना पाठविलेल्‍या पत्रात राज ठाकरे यांनी सरकारनेही समंजस भूमिका घेउन वीजबील माफी दयावी अशी मागणी त्‍यांनी केली आहे. कोणत्‍याही परिस्‍थितीत वाढीव वीज बीले भरू नका असे आवाहन राज ठाकरे यांनी राज्‍यातील जनतेला केले आहे. एप्रिल महिन्यापासूनच्या लॉकडाउननंतर जनतेचे कंबरडे मोडले.अनेकांच्या नोक-या गेल्‍या.उदयोगव्यवसायालाही घरघर लागली.एका बाजूला ठप्प झालेले अर्थकारण आणि दुस-या बाजूला आजाराची भिती अशा दुहेरी संकटाशी जनता लढत असताना सरकारने वीजबीलाचा शॉक दिला.

पुर्वी जसा जिझिया कर लावला जायचा तसाच जिझिया कर लावून जनतेची लूट सुरू केली.आम्‍ही उर्जामंत्री नितीन राउत यांची भेट घेतली.राज्‍यपालांपर्यंत गेलो त्‍यांनीही सरकार काही करत नाही याचे दुःख व्यक्‍त केले.शंभर युनिट पर्यंत माफी देऊ असा शब्द देणा-या राऊत यांनी नंतर घूमजाव केले. कोणतीही सवलत देणार नाही अशी भाषा बोलू लागल्‍यानंतर आमचा संयम आता संपला आहे.राज्‍य सरकारने समंजसपणा दाखवून वाढीव वीज बील माफी दयावी अन्यथा आम्‍हालाच सरकारला शॉक दयावा लागेल असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.

नव्या रेल्वे मार्गामुळे दक्षिण भाग जोडला जाणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या