19.1 C
Latur
Wednesday, January 20, 2021
Home महाराष्ट्र आता रब्बी सिंचनासाठी दिवसाही वीजपुरवठा होणार

आता रब्बी सिंचनासाठी दिवसाही वीजपुरवठा होणार

शेतक-यांसाठी उर्जामंत्र्यांची मोठी घोषणा; पुरेसा वीजपुरवठा उपलब्ध होणार

एकमत ऑनलाईन

नागपूर : सततच्या नापिकी आणि नैसर्गिक संकटाला कंटाळलेल्या बळीराजाला आज मोठा दिलासा देण्यात आला असून, रब्बी सिंचनपिक घेणा-या शेतकरीबांधवांना आता लवकरच दिवसाही वीजपुरवठा उपलब्ध होणार असल्याची माहिती गुरवार दि़ १२ नोव्हेंबर रोजी राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे.

नैसर्गिक संकटांमुळे खरीप हंगामात प्रचंड नुकसान सहन करावे लागलेल्या शेतकºयांना आता राज्य सरकारकडून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता असून, रब्बी हंगामासाठी राज्यातील शेतक-यांना सिंचनासाठी दिवसाही वीज देण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरु आहे. राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी गुरुवार दि़ १२ नोव्हेंबर रोजी एका खासगी वाहिनीला मुलाखतीप्रसंगी यासंदर्भातील माहिती दिली.

आम्ही राज्यात रब्बी हंगामात शेतक-यांना सिंचनासाठी दिवसा वीज देण्याचा विचार करत आहोत. याबाबतचा निर्णय अंतिम झाल्यास सिंचनासाठी अखंडित वीज देण्याच्या सूचना मुख्य अभियंत्यांना देण्यात येतील. कोरोनाच्या संकटानंतर राज्यातील वीजेची मागणी वाढली असली तरी पुरेसा वीजपुरवठा होईल, अशी ग्वाही उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली. दोन दिवसांत नुकसान भरपाईचे पैसे खात्यात

निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतक-यांना आर्थिक मदत देण्याचा राज्य सरकारचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार आता येत्या शनिवारपर्यंत शेतक-यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे.

सोलापूरसाठी २९४ कोटी ८१ लाख मंजूर
जून ते ऑक्टोबरदरम्यान नुकसान झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकºयांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून २९४ कोटी ८१ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील जवळपास पाच लाख पूरग्रस्त शेतकºयांची खातेनिहाय यादी तयार करण्यात आली आहे. या शेतकºयांच्या खात्यात शनिवारपर्यंत पैसे जमा होतील.

वीज कर्मचा-यांच्या संपा तिढा लवकरच सुटणार
राज्यातील वीज कर्मचा-यांच्या संपाबाबतही नितीन राऊत यांनी भाष्य केले. वीज कर्मचारी सध्या आपल्याशी चर्चा करत आहेत. हा तिढा लवकरच सुटेल. वीज कर्मचारी संपावर जाणार नाहीत. कोणाचीही दिवाळी अंधारात जाणार नाही, असे नितीन राऊत यांनी सांगितले.

देशाचा रिकव्हरी रेट वाढला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या