34.3 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeमहाराष्ट्रआता वाझेचा लेटरबॉम्ब

आता वाझेचा लेटरबॉम्ब

एकमत ऑनलाईन

नवी मुंबई : अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझे यांनी राज्याला हादरवून टाकणारा गौप्यस्फोट केला. आपल्या नियुक्तीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता. ते आपल्याला हटवू इच्छित होते. त्यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, असा खळबळजनक दावा सचिन वाझेने एनआयएला लिहिलेल्या पत्रात केला केला आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यानंतर निलंबित पोलिस अधिकारी वाझेनेही ‘लेटरबॉम्ब’ टाकला आहे. सध्या एनआयएच्या कोठडीत असलेल्या वाझेने एनआयएला एक पत्र लिहिले असून, त्यामध्ये तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप केला आहे. वाझेने स्वत:च्या हस्तक्षरात एनआयएला पत्र लिहिले आहे. २०२० मध्ये मला पोलिस दलात घेण्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता. माझी नियुक्ती रद्द करण्यात यावी, अशी शरद पवारांची इच्छा होती. मात्र, आपण शरद पवारांचे मतपरिवर्तन करू, असे तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला सांगितले होते. या कामासाठी देशमुख यांनी मला २ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, असा दावा वाझेने पत्रात केला आहे.

अनिल परब यांच्यावरही आरोप
वाझे यांनी अनिल देशमुख यांच्याबरोबरच राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब यांच्यावरही खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. अनिल परब बृहन्मुंबई महापालिकेशी संलग्नित असलेल्या ५० कंत्राटदारांकडून २ कोटी गोळा करण्यास सांगितले होते, असेही वाझेने एनआयएला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

वाझेच्या चौकशीसाठी सीबीआयला परवानगी
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन सापडल्याप्रकरणी अटक असलेले निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेच्या कोठडीत वाढ करण्यात आली. वाझेला विशेष एनआयए कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने ९ एप्रिलपर्यंत कोठडी वाढविली. यावेळी कोर्टाने सीबीआयला वाझेची चौकशी करण्यासाठी परवानगी दिली. चौकशी करण्यासाठी वेळेचे नियोजन करा, असे कोर्टाने सीबीआयला सांगितले. स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटके आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी सध्या एनआयकडून तपास सुरू आहे. ही चौकशी सुरू असतानाच आता सचिन वाझेची सीबीआय चौकशी करण्यास कोर्टाने परवानगी दिली.

गृहमंत्र्यांनी सांगितले नाही, मात्र वाझेंचा निरोप : पाटील
सचिन वाझेच्या प्रकरणात दिवसेंदिवस धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणात एसीपी संजय पाटील यांनी २२ मार्च रोजी जबाब नोंदविला. त्यात त्याने सचिन वाझेने पैशाच्या वसुलीबाबत सांगितले होते, अशी कबुली दिली. गृहमंत्र्यांनी मला वसुलीबाबत सांगितल्याचे वाझे यांनी मला सांगितले, अशी कबुली संजय पाटीलने दिली. तसेच गृहमंत्र्यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावरही गेलो होतो. त्यावेळी गृहमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाला भेटलो. मात्र, गृहमंत्र्यांना भेटलो नाही आणि वसुलीबाबतही चर्चा झाली नाही,असेही पाटील यांनी सांगितले.

दिवसभरात १ लाख १५ हजार ३१२ नवे रुग्ण आढळले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या