22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeमहाराष्ट्रओबीसींना १९ जुलैच्या निर्णयात राजकीय आरक्षण मिळेल ; चंद्रशेखर बावनकुळे यांना अपेक्षा

ओबीसींना १९ जुलैच्या निर्णयात राजकीय आरक्षण मिळेल ; चंद्रशेखर बावनकुळे यांना अपेक्षा

एकमत ऑनलाईन

नागपूर : नगरपालिका निवडणुकांमध्ये ओबीसींना धक्का बसला आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू असून तिथे सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. यासंदर्भात ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, बांठिया आयोगाचा रिपोर्ट तयार झाला आहे.

बांठिया आयोगाच्या रिपोर्टवर १९ जुलैला मंगळवारी चर्चा होईल. महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण २७ टक्क्यांच्या वर अपेक्षित आहे. काही ठिकाणी लोकसंख्येप्रमाणे हे आरक्षण राहणार आहे. त्यातही ५० टक्क्यांच्या आत आरक्षण मिळणार आहे. कोर्टाने ट्रीपल टेस्ट सांगितली. ही टेस्ट करून बांठिया आयोग पुढच्या मंगळवारी ही कोर्टासमोर सादर करेल.

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनुसार, नॉमिनेशन सुरू झाले तिथे ओबीसी आरक्षण थांबविता येणार नाही. जिल्हाधिकारी २० जुलैला नोटिफिकेशन करणार आहेत. त्यानंतर ख-या अर्थाने निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल. तत्पूर्वी १९ जुलैला न्यायालयात काय होते त्यावर सर्व अवलंबून राहणार आहे. कारण गेल्या अडीच वर्षांच्या काळात ठाकरे सरकारने टाईमपास केला, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. परंतु, आता येत्या मंगळवारी सकारात्मक निर्णय येईल, अशी अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.

ओबीसी मंत्र्यांनी प्रश्न व्यवस्थित हाताळला नाही
आता १९ जुलैच्या निर्णयाची वाट पाहण्यावाचून पर्याय नाही. ठाकरे सरकारमध्ये छगन भुजबळ यांची संघटना आंदोलन करत होती. यापूर्वीच्या ठाकरे सरकारने अडीच वर्षे टाईमपास केला. त्या-त्या वेळी योग्य पद्धतीने काम करणे अपेक्षित होते, ते झाले नाही. त्यानंतर बांठिया आयोग नेमला. ओबीसी मंत्र्यांनी त्यावेळी योग्य पद्धतीने हा प्रश्न हाताळला नाही.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर यांनी तातडीने ओबीसी आयोगाची बैठक घेतली. सॉलिसीटर जनरलला दिल्लीला जाऊन भेटले. याला म्हणतात गतिमान सरकार. त्यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. ओबीसींना आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी सर्वांनी मिळून काम करण्याची गरज होती. पण, अडीच वर्षे आम्ही सरकारला मदत करायला तयार होतो पण, ते सरकार ऐकत नव्हते, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या