28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रसरकारी वकिलांच्या परीक्षा आता मराठीतून

सरकारी वकिलांच्या परीक्षा आता मराठीतून

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्याची भाषा असलेल्या मराठीचा प्रचार करण्यासाठी आणि भविष्यात सरकारी वकिलांच्या पदाच्या परीक्षाही इंग्रजीशिवाय मराठीतूनच घ्याव्यात, यासाठी महाराष्ट्र सरकारला आपले धोरण लागू करण्यासाठी गंभीर राहण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. महाराष्ट्रात सरकारी वकील भरती परीक्षा मराठीतून घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपले धोरण गांभीर्याने राबवावे, असे निर्देशही मुंबई उच्च न्यायालयाने दिले.

मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती एसव्ही गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती आर. एन. लड्ढा यांच्या खंडपीठाने प्रताप जाधव यांच्या याचिकेसंदर्भात बोलताना हे निर्देश दिले. तसेच सरकारी वकिलांच्या पदांसाठी होणारी परीक्षा इंग्रजीऐवजी मराठीतून घेण्याचा आदेशही मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिला आहे.

सरकार म्हणू शकत नाही की न्यायदंडाधिकारी आणि दिवाणी न्यायाधीशांच्या परीक्षेसाठी मराठी भाषेत उत्तरे दिली जाऊ शकतात आणि सरकारी वकिलांच्या परीक्षेसाठी तीच सुविधा दिली जाणार नाही. खरे तर स्थानिक भाषेला (मराठी) प्रोत्साहन देणे ही सरकारची सर्वसाधारण भूमिका आहे, असे उच्च न्यायालय म्हणाले.

मराठीच्या प्रचारास मदत
सरकारी वकिलांसाठी घेण्यात येणारी पुढील परीक्षा इंग्रजी तसेच मराठी भाषेत घेण्यात यावी, याची खात्री सरकार करेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. या आदेशामुळे महाराष्ट्र सरकारच्या मराठीचा प्रचार करण्याच्या धोरणाची अंमलबजावणी होण्यास मदत होईल, असेही न्यायालयाने म्हटले. यावर्षी सरकारी वकिलांच्या पदांसाठी ७,७०० उमेदवार परीक्षेला बसले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या