25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रराज ठाकरे यांच्या पायाची शस्त्रक्रिया

राज ठाकरे यांच्या पायाची शस्त्रक्रिया

एकमत ऑनलाईन

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पायाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. मुंबईच्या लीलावती रुग्णालयात सोमवारी त्यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया करण्यात आली. तब्बल दीड तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असली तरी पुढचे तीन महिने त्यांना वॉकरचाच आधार घ्यावा लागणार आहे. तसेच कुठल्याही सभा, कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नाही. अर्थात, त्यांना सक्तीची विश्रांती घ्यावी लागेल.

राज्यातील महापालिकांच्या निवडणुकाही अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशा काळात राज ठाकरे यांनाच घराबाहेर पडता न येणे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी चिंता वाढवणारी गोष्ट आहे. राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करणा-या डॉ. जलील पारकर आणि डॉ. विनोद अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती दिली. येत्या चार ते पाच दिवसांत राज ठाकरे यांना रुग्णालयातून घरी सोडले जाईल. मात्र, घरी गेल्यानंतर राज ठाकरे यांना फिजिओथेरपी घेणे आवश्यक असल्याचे म्हटले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या