33.7 C
Latur
Monday, March 1, 2021
Home महाराष्ट्र दुष्काळग्रस्त गावाचे चित्र अधिका-याने पालटले

दुष्काळग्रस्त गावाचे चित्र अधिका-याने पालटले

एकमत ऑनलाईन

मुंबई: समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द जर एखाद्यामध्ये असेल तर अशी व्यक्ती किती मोठे कार्य करु शकते, याचे उत्तम उदाहरण एका सरकारी अधिका-याने दाखवून दिले आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव या सातत्याने दुष्काळग्रस्त व शेतकरी आत्महत्त्यांचे केंद्रस्थान बनलेल्या गावाचे चित्र या अधिका-याने बदलून टाकले आहे.

डॉ. उज्ज्वल चव्हाण असे या अधिका-याचे नाव असून ते मुंबईतील इन्कम टॅक्स विभागात जॉइंट कमिश्नर म्हणून कार्यरत आहेत. धामणगावात २०१६ साली दुष्काळामुळे अत्यंत विदारक स्थिती निर्माण झाली होती. नापिकीमुळे मोठे क्षेत्र असलेले शेतकरीही संकटात सापडले होते. ४० एकर क्षेत्र असलेले अनेक शेतक-यांनी आत्महत्या केली होती. चव्हाण यांचे हे मुळगाव होते. सुटीदरम्यान जेव्हा ते मुळगावी येत, तेव्हा त्यांना गावाची ही दुरावस्था पाहवली नाही. स्थानिक नद्या कोरड्या पडल्या होत्या, पाऊस होत नव्हता. दोन दशकांपासून गावात व परिसरात असलेली ही समस्या होती.त्यांनी गाव सुधरवण्याचा चंग बांधला. जमिनीत पाण्यात कमतरता आणि दुष्काळ या समस्यामुळे शेतक-यांसोबतच सर्वसामान्य लोकही प्रभावित झाले. डॉ. उज्ज्वल चव्हाण यांनी जेव्हा ही दुर्दशा पाहिली तेव्हा त्यांना धक्काच बसला. आपल्या गावासाठी काहीतरी करण्याचा निश्चय केला.

जलसंधारणाच्या कामांवर दिला भर
द बेटर इंडियाच्या रिपोर्टनुसार, त्यांनी या समस्येबाबत उपाय शोधण्यास सुरुवात केली. आधी त्यांनी एक जल संधारण योजना सुरु केली. नद्या आणि भूजल स्थिती ठिक करण्याचे ठरवले. त्यासाठी छोटे बांध आणि जल संरक्षणासाठी खोदकाम केले. जलसंधारणाच्या केलेल्या या प्रयत्नातून गावाच्या शिवारात तब्बल २२ कोटी लीटर पाणी जमा करता आले. परिसरातील पाण्याची समस्याच दूर झाली. या कामात गावातील लोकांनीही त्यांची खूप मदत केली. काही एनजीओ समोर आल्या. गावातील लोकांनी १ हजार रूपयांपासून आर्थिक मदत केली. ज्यांना जी जमेल ती मदत केली आणि आज गावातील पाण्याची समस्या दूर झाली. इथला शेतकरी सुखावला आहे.

इतरही गावात केला सुधार
हेच मॉडेल त्यांनी इतर १६ गावांमध्येही लॉन्च केले. ज्यामुळे अनेक गावे ३ वर्षांच्या आत दुष्काळातून बाहेर पडली. परिसरातील तब्बल ३० हजार शेतक-यांना फायदा मिळत आहे. ते स्वत: एका शेतकरी कुटूंबातील आहेत. त्यांचे वडील शेतकरी आहेत. आई शिक्षिका आहेत.शेतीच्या समस्या त्यांनी पाहिल्या आहेत. आपल्या केंद्रसरकारी नोकरीच्या माध्यमातून त्यांनी शेतीत बदल केला.

आप आमदार भारतींना २ वर्षांची शिक्षा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या