27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रबृजभूषण यांचा पवारांसोबतचा जुना फोटो व्हायरल, चर्चेला उधाण

बृजभूषण यांचा पवारांसोबतचा जुना फोटो व्हायरल, चर्चेला उधाण

एकमत ऑनलाईन

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्येत जाऊन प्रभू रामांचं दर्शन घेणार होते. मात्र त्यांच्या या अयोध्या यात्रेचा रथ भारतीय जनता पार्टीच्याच एका खासदाराने अडवून धरला. ते खासदार बृजभूषण सिंह यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यासोबतचा एक फोटो मनसेने ट्विट केला आहे. यावरून, ब्रृजभूषण यांच्या भूमिकेपाठीमागे शरद पवार तर खरे सूत्रधार नाहीत ना अशी चर्चा सुरू झाली आहे.

उत्तर प्रदेशात पाय ठेवायचा असेल तर उत्तर भारतीयांविरोधात केलेल्या आंदोलनाबद्दल, मारहाणीबद्दल माफी मागावी लागेल असे त्यांनी सांगितले.
बृजभूषण दररोज टीव्हीवर येऊन, पत्रकार परिषदा घेऊन आपली भूमिका मांडू लागले. मनसेच्या आंदोलनात जखमी झालेल्या उत्तर भारतीय लोकांनाही त्यांनी पत्रकार परिषदेत बोलावून त्यांची व्यथा सर्वांसमोर मांडली.
भाजपा खासदारांकडून होत असलेला विरोध लक्षात घेऊन हा एक ‘ट्रॅप’ असल्याचे राज ठाकरे यांच्या लक्षात आले. अयोध्या दौरा ‘तूर्तास’ स्थगित असे ट्विट करून त्यांनी पुण्यातल्या सभेत त्याचे कारणही स्पष्ट केले.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
आपल्या पुण्यातील भाषणात राज ठाकरे म्हणाले, ज्या दिवशी लाऊडस्पीकर बंदची घोषणा केली त्या दिवशीच अयोध्येला जाण्याची घोषणा केली होती. ही तारीख जाहीर केली. त्यानंतर काही दिवसांतच मला अयोध्येला येऊ देणार नाही, असे तिकडे सुरू झाले. हे प्रकरण वाढत असल्याचे मी पाहत होतो. मला मुंबई, दिल्ली आणि उत्तर प्रदेशातूनही याबाबत माहिती मिळत होती. पण एक वेळ अशी आली की माझ्या लक्षात आले की हा एक सापळा आहे. आपण या सापळ्यात अडकता कामा नये. कारण या सगळ्याची रसद पुरवण्याची सुरुवात महाराष्ट्रातूनच झाली. हा विषय पुन्हा बाहेर काढा, असे त्यांचे प्रयत्न होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या