28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeमहाराष्ट्रमुंबईतील डॉक्टर कृष्णकुंज वर

मुंबईतील डॉक्टर कृष्णकुंज वर

एकमत ऑनलाईन

मुंबई : कोरोनाच्या सध्याच्या भयानक परिस्थितीत मुंबईत निवासी डॉक्टर्स जीव धोक्यात घालून काम करत आहेत. मात्र तरीही या डॉक्टरांना अद्याप वेतनवाढ मिळालेली नाही. याशिवाय त्यांच्या विद्यावेतनावर टॅक्सही कापला जातो. यांसह इतर सर्व मागण्या घेऊन मार्ड डॉक्टरांच्या शिष्टमंडळांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर लवकरच राज ठाकरे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेणार आहेत. त्यांच्यापुढे हे सर्व विषय मांडणार आहेत, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

मार्ड डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांसाठी सकाळी राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवासस्थानी मार्ड डॉक्टरांच्या शिष्टमंडळाची बैठक आयोजित केली होती. यावेळी त्या डॉक्टरांनी गेल्या ११ महिन्यांतील थकित वेतनवाढ झालेले वेतन आम्हाला अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे हे वेतन त्वरित मिळावे, अशी प्रमुख मागणी या डॉक्टरांनी राज ठाकरेंसमोर मांडली. या मागणीला राज ठाकरेंनी पाठिंबा दिला.

लवकरच न्याय मिळेल
राज ठाकरेंनी आम्हाला या संदर्भात न्याय मिळेल असे आश्वासन दिले आहे. गेल्या दोन दिवसांपासून आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलन करतो आहोत. कोरोना रुग्णांना त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत, असेही ते म्हणाले. तसेच लवकरच राज ठाकरे राजेश टोपे यांची वेळ घेऊन त्यांच्यापुढे हा विषय मांडतील, असेही ते म्हणाले.

आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी पुढाकार घ्यावा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या