24.8 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रनीती आयोगाच्या धर्तीवर राज्यातही स्वतंत्र संस्था

नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यातही स्वतंत्र संस्था

एकमत ऑनलाईन

मुंबई : केंद्रातील नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात स्वतंत्र अशी संस्था उभारण्यात येणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफर्मेनशन असे या संस्थेचे नाव असेल. ही संस्था शेती, आधुनिक तंत्रज्ञान, ब्लॉकचेन आणि दळणवळण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे काम करेल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईत रविवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडल्याचे सांगितले. या बैठकीला नीती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्राकडून नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात स्वतंत्र संस्था उभारण्यासंदर्भातील प्रस्तावाचे सादरीकरण करण्यात आले. निती आयोगानेही यावर काही सूचना मांडल्या आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात नीती आयोगाच्या धर्तीवर इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफर्मेशन ही संस्था उभारण्याला मुख्यमंत्र्यांनी तत्वत: मान्यता दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

आता मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल. त्यानंतर या संस्थेची एकूण रचना आणि कामाचे स्वरुप याविषयी माहिती देऊ, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने भारतीय अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलर्सची करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्यादृष्टीने वाटचाल करण्यासाठी महाराष्ट्रात स्वतंत्र संस्था स्थापन होईल. ही संस्था सरकारी मालमत्तांचे निर्गुंतवणुकीकरण, कृषी क्षेत्रात ब्लॉकचेन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, दळणवळण अशा वेगवेगळ््या क्षेत्रांत काम करेल. नीती आयोगाचे सीईओ आणि प्रमुख अधिका-यांसमोर या सगळ््याचे सादरीकरण करण्यात आले.

शेतक-यांना मदत करू
संततधार पावसामुळे जिथे पिकाचे नुकसान झालेले असेल आणि ३३ टक्क्यांच्यावर नुकसान असेल, तिथे मदत केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच केलेली आहे. त्या संदर्भात काही अध्यादेश निघाले आहेत तर काही निघत आहेत. आता पुन्हा पाऊस पडला आहे. त्यात जर का नवीन क्षेत्र बाधित झाले असेल, तर त्याचेदेखील पंचनामे करून मदत केली जाईल, असे फडणवीस म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या