मुंबई : सत्ता असो वा नसो शिवसेनेला फरक पडत नाही. शिवसेना जागेवरच, सेनेला अजिबात धक्का लागलेला नाही. शिवसेनेचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. उद्या (सोमवारी) कळेल लोकशाही शिल्लक आहे की नाही, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.
रविवारी (ता. १०) मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची बैठक पार पडली. या बैठकीला खासदार संजय राऊत उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. आमच्या १५-१५ तास बैठका सुरू आहेत. प्रत्येक शिवसैनिक येत आहे. उद्धव ठाकरे यांना भेटत आहे असेही संजय राऊत म्हणाले. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. आम्ही नेहमीसाठी मातोश्रीसोबत आहे. मातोश्री आमच्यासाठी आई आहे.
बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी आई आहे. आमचे मातोश्रीसोबत असलेले संबंध तोडणार नाही. आमचे संबंध कोणी तोडूही शकत नाही, असेही संजय राऊत म्हणाले. आदित्य ठाकरे वगळता शिंदे गट व शिवसेनेच्या ५३ आमदारांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. सोमवारी दोन्ही गटांच्या अर्जावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. लोकशाही आणि न्यायव्यवस्था वेगवेगळ्या आहे की नाही, हे उद्या कळेल. कायद्याची पायमल्ली सुरू आहे. मोठ्या प्रमाणात दबाव टाकला जात आहे. हे आम्हाला माहिती आहे असेही संजय राऊत म्हणाले.