22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रलोकसभा जागेवरून पुन्हा एकदा दानवे-खोतकर वाद आला समोर

लोकसभा जागेवरून पुन्हा एकदा दानवे-खोतकर वाद आला समोर

एकमत ऑनलाईन

जालना : शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी शनिवारी शिंदे गटात सहभागी होण्याची घोषणा केली. त्यापूर्वी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रावसाहेब दानवे आणि खोतकर यांची दिलजमाई सुद्धा केली. मात्र ही दिलजमाई होऊन चार दिवस उलटत नाही तो आता लोकसभा जागेवरून पुन्हा एकदा दानवे-खोतकर वाद पाहायला मिळाला आहे.

जालना लोकसभा जागेवर आपला हक्क सोडला नसल्याचा दावा खोतकर यांनी केला आहे, तर आपण लोकसभा जागा कुणासाठीही सोडणार नसल्याचा दावा दानवे यांनी केला आहे.
गेली चार-पाच दिवस अर्जुन खोतकर दिल्लीत ठाण मांडून बसले होते. यादरम्यान खोतकर आणि मुख्यमंत्री शिंदे यांची भेट झाली. तसेच दानवे आणि खोतकर यांची मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट घडवून त्यांना एकत्र येण्याचे आवाहन करत दोघांची दिलजमाई केली. मात्र यावेळी आपल्याला जालना लोकसभा मतदारसंघ सोडावा अशी मागणी खोतकर यांनी केली होती.

शनिवारी शिंदे गटात सहभागी होतांना सुद्धा खोतकर यांनी लोकसभा जागा आपल्यला सोडण्याची मागणी कायम असून, आपण माघार घेतली नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केले. त्यांच्या याच दाव्यावर बोलतांना रावसाहेब दानवे म्हणाले की, ज्या जमिनीत मेहनत करून, तब्बल २५ वर्षे कष्ट करून तिला सुपीक केलं, आता ती जमीन मी इतरांना कसायला कशी देणार? असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला. त्यामुळे दानवे आणि खोतकर यांच्यातील वाद अजूनही मिटलेला नसल्याचे स्पष्ट होत आहे.

मुख्यमत्र्यांसमोर वाद मिटवण्याचे आव्हान?
खोतकर आणि दानवे हे वाद काही नवीन नाही. गेली अनेक वर्षे या दोन्ही नेत्यांमधील राजकीय वाद चर्चेत राहिला आहे. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मध्यस्थी करावी लागली होती. मात्र निवडणुकीनंतर सुद्धा या दोन्ही नेत्यांमधील वाद काही मिटू शकला नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा वाद मिटवणे एक आव्हान असणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या