18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यपालांचे धोतर फाडणा-यास दीड लाखांचे बक्षीस

राज्यपालांचे धोतर फाडणा-यास दीड लाखांचे बक्षीस

एकमत ऑनलाईन

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमानकारक वक्तव्य करणा-या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे धोतर फाडणा-याला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे १ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षिस जाहीर झाले आहे.

विशेष म्हणजे राज्यपालांचे धोतर फाडणा-यास पुणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून १ लाखांचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आता सोलापूर शिवसेनेतर्फेही दीड लाखांचे बक्षिस जाहीर करत असल्याची घोषणा सोलापूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी केली आहे.

राज्यपालांची हकालपट्टी करा
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवरायांच्या बाबतीत अवमानकारक वक्तव्य करून संपुर्ण ंिहदुस्थानातील शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे राज्यपालांची ताबडतोब हकालपट्टी करावी व त्रिवेदी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सोलापूर शिवसेनेच्यावतीने करण्यात आली.

राष्ट्रावादीकडूनही बक्षिस जाहीर
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात बॅनरबाजी केली आहे. बॅनरवर राज्यपालाचे धोतर फाडणा-याला १ लाखांचे बक्षीस दिले जाईल अशी घोषणा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या