22.5 C
Latur
Sunday, September 26, 2021
Homeमहाराष्ट्रमहाड दुर्घटनेत एकाचा मृत्यू तर 60 जणांना वाचवण्यात यश

महाड दुर्घटनेत एकाचा मृत्यू तर 60 जणांना वाचवण्यात यश

एकमत ऑनलाईन

रायगड : महाड शहरातील 5 मजली इमारत सोमवारी रात्री पात्यासारखी कोसळली या इमारतीत 41 कुटुंब राहत होते. त्यातील 60 जणांना बाहेर काढलं असून आतापर्यंत या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर 26 लोक अद्याप आत अडकल्याची शक्यता आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून रेस्क्यू ओफ्रेशन रात्रभर सुरु आहे. जखमींवर महाडच्या देशमुख रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पुण्याहून एनडीआरएफची तीन पथकं महाडला पोचल्यानंतर मदत कार्याला जोरदार सुरवात करण्यात आली आहे. घटनास्थळी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कुटुंबाना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. 8 तव, 10 जेसीबी, 4 पोखलेन तसेच, 15 डंपरच्या साहाय्याने मातीचा ढिगारा हटवण्यात येत आहे. सध्या पुणे, महाबळेश्वर ट्रेकर्स, पनवेल येथून फायर ब्रिगेडची टीम महाडमध्ये दाखल झाली आहे.

इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे, दोषींवर तात्काळ कारवाई : एकनाथ शिंदे
ही अंत्यत दुर्दैवी घटना आहे. ही इमारत पत्त्या सारखी कोसळली आहे. अजून आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं जात आहे. अगदी निकृष्ट दर्जाचे काम केलं होतं. जो कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. जे जखमी आणि मृत पावले आहेत त्यांना सरकारकडून योग्य मदत दिली जाईल. शहरात ज्या जुन्या इमारती आहेत, त्यासाठी क्लस्टर योजना आणली आहे.

इंजिनिअरिंग परीक्षा स्थगितीस नकार; सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या