23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत

राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत

एकमत ऑनलाईन

मुंबई : काद्यांचे भाव पडल्याने राज्यातील शेतक-यांवर प्रचंड आर्थिक ताण आला आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने केंद्राला नाफेडमार्फत २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याची विनंती केली आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियूष गोयल यांना मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत पत्र लिहिले आहे.

राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या कांद्याचे भाव पडल्याने मोठ्या आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने आपल्या नॅशनल अ‍ॅग्रीकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियामार्फत २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करावा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने माहिती दिली आहे, पण राज्यातील सध्याचा कांद्याचा भाव काय आहे याचा उल्लेख केलेला नाही. कांदा हे महाराष्ट्रातील महत्वाचे नगदी पीक आहे. भारतात कांद्याचे ३५ ते ४० टक्के उत्पादन होते.

२० लाख मेट्रिक टन अधिक उत्पादन
चांगल्या पावसामुळे १३६.७० लाख मेट्रिक टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज २०२१-२२ मध्ये वर्तवण्यात आला होता, जो गेल्या हंगामापेक्षा २० लाख मेट्रिक टन अधिक आहे. उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने एकूणच कांद्याचा बाजारभाव दणक्यात कोसळला आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये निराशेचे आणि चिंतेचे वातावरण आहे असे सीएमओने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

श्रीलंकेतील निर्यात थांबल्याने अडचण
श्रीलंकेकडून भारतातून सर्वाधिक प्रमाणात कांदा आयात केला जातो. पण श्रीलंकेतील निर्यात ठप्प झाली आहे कारण त्या देशात सध्या आर्थिक संकट निर्माण झाले आहे. एकूणच आंतरराष्ट्रीय स्तरावरील बदलत्या घडामोडीमुळे निर्यातीमार्फत आपल्या शेतक-यांना मालाची चांगली किंमत मिळणे अशक्य आहे असेही मुख्यमंत्री कार्यालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या