25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeमहाराष्ट्रसोन्या चांदीपेक्षा चोरट्यांकडून कांद्यावर डल्ला

सोन्या चांदीपेक्षा चोरट्यांकडून कांद्यावर डल्ला

कोल्हापुरातील घटना ; बटाटा, आले, लसूणही पळवला

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : कांद्याचे भाव वाढल्याने आता चोरट्यांनी आपला मोर्चा कांदा चोरीकडे वळवला आहे. कोल्हापुरात तर मार्केट यार्डातील नऊ पोती कांदा चोरट्यांनी रात्री पळवला असून त्यांची चोरी सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. एवढेच नव्हे तर कांद्यासह बटाटे, आलं आणि लसूणावरही हात साफ केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चार पाच महिन्यापूर्वी दहा ते वीस रूपये किलो असणारा कांदा गेल्या आठ ते दहा दिवसात शंभरीपार गेला आहे. सध्या सर्वत्र त्याच्या दराचीच चर्चा सुरू आहे. कोल्हापुरात तर सोने, चांदी, रोख रक्कम नव्हे तर चोरांनी थेट कांद्यावरच डल्ला मारला.

लॉकडाऊन काळात चोरट्यांचा धुमाकूळ वाढला होता. घरफोडी, जबरी चो-यांच्या घटना वाढल्या आहेत. सोने, चांदी आणि रोख रक्कमेवर चोरटे डल्ला मारत आहेत. मात्र गुरुवारी कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिस ठाण्यात एका व्यापा-याने दिलेल्या फिर्यादीने पोलिसही चक्रावले. व्यापा-याने दिलेल्या फिर्यादीत त्याच्या गोडावूनमधील कांदे चोरीला गेल्याचे ऐकताच पोलिसाने कपाळाला हात मारून घेतला.

गेल्या आठ दिवसापासून कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. दहा रूपये किलो मिळणारा कांदा थेट शंभरीपार केल्याने सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यात पाणी येत आहे. आता चोरांनीही कांद्यावरच डल्ला मारल्याने कांद्याला सोन्या चांदीपेक्षाही अधिक महत्त्व आल्याचे अधोरेखित होत आहे. व्यापा-याच्या मार्केट यार्डातील गोडावूनमधून चोरट्यांनी नऊ पोती कांद्यासह पाच पोती बटाटा, एक पोती आलं आणि पाच पोती लसूण देखील पळवला आहे.

ताहेरा फाउंडेशनचे कार्य उल्लेखनीय – स्वरूपाराणी मोहिते पाटील

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या